स्वागतकक्ष arrow सय arrow शतायुषी दान
शतायुषी दान
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   

देई गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान, देवा
गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान ऽ ऽ ऽ . . . ॥ध्रु.॥

गुरूगृही जाण्यासाठी, पुरे प्रेमाचे बंधन
गुरूचरणी लाभते, सुखशांतीसमाधान
सुखशांतीसमाधान ऽ ऽ ऽ
देई गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान, देवा
गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान ऽ ऽ ऽ  . . . १

गुरूसेवेमध्ये होई, माझी काया ही चंदन
गुरूचरणाशी माझे, नित्यनेमानं वंदन
नित्यनेमानं वंदन ऽ ऽ ऽ
देई गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान, देवा
गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान ऽ ऽ ऽ  . . . २

गुरूकृपा हेच माझं, सर्व संसाराचं धन
तुझ्याकडे देवा माझं, नाही दुजं रे मागणं
नाही दुजं रे मागणं ऽ ऽ ऽ
देई गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान, देवा
गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान ऽ ऽ ऽ  . . . ३

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color