खेळगडी
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   

या रे सारे या रे
सारे तुम्ही या रे
बाळाशी अमुच्या
खेळायाला या रे . . . १

काऊ चिऊ या रे
मैना राघू या रे
खेळगडी बाळाचे
होऊनिया या रे . . . २

हम्मा तूही ये गं
गोड दूध दे गं
बाळाला अमुच्या
भरवाया ये गं . . . ३

माऊल्या तूही ये रे
भू भू तूही ये रे
सांडलेला खाऊ गोड
खाण्यासी या रे . . . ४

खाऊ खाता खाता
गाणे तुम्ही गा रे
ऎकताना गाणे अमुचा
बाळ झोपी जाई रे . . . ५डाऊनलोड करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color