स्वागतकक्ष arrow सय arrow का करिसी चिंता
का करिसी चिंता
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   

हरि असता मदतीस तुला तू
का करिसी चिंता सखया ऽ ऽ ऽ
हरि असता मदतीस तुला तू . . . ध्रु.

सान असो वा मोठे संकट
येता मुळी तू करी न झंझट
थोडी जरी तू करिसी खटपट
नंदाघरचा कृष्णचि नटखट
ये तुज ताराया ऽ ऽ, सखया ऽ ऽ ऽ . . . १

दुष्कर्माची धरी ना संगत
सर्वांवरी धरी प्रीती उत्कट
उगा करी ना पोकळ वटवट
तरीच होईल तव जीवनपट
आदर्शचि जगी या ऽ ऽ, सखया ऽ ऽ ऽ . . . २

कर्म आपुले अविरत करिता
भलेपणाने जगी वर्तता
ध्येयशिखर ते दिसू लागता
यशमाला करि घेऊनि त्राता
ये तुज भेटाया ऽ ऽ, सखया ऽ ऽ ऽ . . . ३डाऊनलोड करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color