अरे मना
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   

पवनापुढती धावत जासी
अरे मना, अतिवेगाने
पळभरी बैसुनि एके जागी
ऎकुनि घे तू हे म्हणणे - - - १

जगात आणिती मातपिता तुज
माया आणि ममतेने
आयुष्याच्या अंती सुद्धा
सांभाळी त्या प्रेमाने - - - २

वागू नको तू कधि कुणाशी
रागाने वा द्वेषाने
सकलांशी परि सुखे वागता
जिंकी जगा तू सहजपणे - - - ३

अर्ध्या हळकुंडाने सखया
बरे न ते पिवळे होणे
प्रेमचि करता सकल जनांवरी
काही न राही तुला उणे - - - ४

देवाजीने दिले तुला
अनंतहस्ते हे देणे
त्या आयुष्या करी माती वा
करी तयाचे तू सोने - - - ५डाऊनलोड करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color