स्वागतकक्ष arrow इ-प्रकाशन arrow धुवाधार पाऊस पडतोय कधीचा !!
धुवाधार पाऊस पडतोय कधीचा !!
लेख़क prakash111   
धुवाधार पाऊस पडतोय कधीचा !! प्रचंड काळे ढग क्षितिजाच्या पलीकडे पसरलेले. प्रकाशाचा मागमूस शुन्य असा टिंब टिंब उदास प्रकाश सर्वत्र दूरपर्यंत ....क्षितिजापर्यंत ...!! मी एकटाच खिडकीतून बघतोय हा पाऊस झोडपून काढतोय कधीचा प्रलय येईल असे वाटतेय. मी उदास !आत्ममग्न !! झाडे सुद्धा स्वताला मिटवून घेतायत पावसाचा कल्लोळ पानावर झेलत पाखरे देखील गपगार स्वताच्याच पंखात हरवून गेलेले गप्प.!शांत !! माझ्या दगडी छपरावर कोसळतोय कधीचा एखादी दुसरी चुकलेली गाय डोक्याची ढाल करत निमूट चाललीय सरळ दिशाहीन.....!! वाट चुकल्या सारखी कुणाच्यातरी आश्रयाला ....!! ... मी उदास भिंगुऴवाणा एकटा चिंब चिंब !! नि हा असा भन्नाट पाऊस कोसळतोय कधीचा कधी जाईल माझ्या गावाला ,घराला कुणास ठाऊक ??? .....
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color