पुस्तक परिचय
लेख़क Administrator   
 
    
 

*** पुस्तक परिचय ***

अविनाश टिळक
ग्रंथाली प्रकाशन

एका यक्षाचे अक्षयगान
प्रसिद्ध लेखक श्री. अविनाश टिळक यांच्या वडिलानी आपल्या पत्नीच्या मृत्युनंतर सतत अकरा वर्षे दररोज एक पानाचे पत्र आपया पत्नीस ईंदूस' लिहून संवाद साधला आणि एका अलौकिक प्रेमाचे व निष्ठेचे व्रत आचरले.
आपल्या समोर पत्नी बसली आहे असे समजून सागितलेली दिवसातील घटनांची माहिती, वाचलेले साहित्य, भोवतालचा निसर्ग आणि पूर्व स्मृतींची आठवण व मनातील भावतरंग याचा विलक्षण मिलाफ व पत्नीवरील निसीम प्रेम या पुस्तकात आढळते. वडिलांच्या मृत्युनंतर अठरा वर्षांनी हे याचे ४००० पत्रातील अजरामर साहित्य अविनाश टिळक यानी तेवढ्याच समर्थपणे एक गुंफून या पुस्तकाद्वारे जगासमोर आणले याबद्दल त्यांचे अभिनंदन. ज्येष्ठ नागरिकांना हे पुस्तक विशेष आवडेलच पण प्रत्येक विवाहित जोडप्याने हे पुस्तक वाचले पाहिजे असे मला वाटते. कारण या उदात्त प्रेमाचे दर्शन झाल्याने त्यांची एकमेकांकडे पाहण्याची द्रृष्टी बदलेल आणि वागण्यात सकारामक परिवर्तन घडेल. `जो अस्ताला गेला तो सूर्य होता, हे मला फार उशीरा कळल ! ' असे लेखकाने प्रस्तावनेत म्हटले आहे. या सूर्याला माझे शतश: प्रणाम. डॊ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप
  *** हे पुस्तक इ-प्रकाशनमध्ये पुस्तकस्वरुपात वाचा. ***


संस्कृतदीपिका
सौ. शुभांगी सु. रानडे
ज्ञानदीप

संस्कृतदीपिका - शालेय विद्यार्थ्यांना संस्कृतच्या अभ्यासासाठी नित्य उपयोगी पडणारी महवाची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून हे छोटेखानी पुतक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात मराठी-संस्कृत शब्दकोश, मराठी-संस्कृत धातुकोश, संधी, समास, मराठी वाक्यांचे संस्कृतमध्ये भाषातर, संदर्भ साहिय
यांचा यात समावेश करण्यात आला आहे. संस्कृतदीपिका ओआरजी या वेबसाईटवर शदकोशाशिवाय विभक्तीरुपे, धातुरुपे, सुभाषिते वगैरे सर्व माहिती उपलब्ध आहे. याचाही विद्यार्थ्यांना फायदा घेता येईल.

काव्यदीप
सौ. शुभांगी सु. रानडे
ज्ञानदीप


सांगावा
सौ. शुभांगी सु. रानडे
ज्ञानदीप

सांगावा - कवियित्रीया मनात कविता गाण्याच्या स्वरुपातच असते. एक सुंदर लय घेऊन आलेल्या कवितेचे गाणे मनातून त्याना सतत साद घालत असते. कवयित्रीच्या निरामय, सात्विक आणि सुसंस्कारित मनाचे दर्शन पानोपानी घडते. कवयित्रीची भाषा, तिचे शब्द, तिने वापरलेली रुपके सरळ साधी आहेत. शब्दपांडित्याच्या नादी लागून विचाराना झाकोळून टाकण्यात आलेले नाही. म्हणूनच वाचकाला चटकन ती कविता आपलीशी वाटते.
- सौ. लीना सोहोनी


प्रकाशक :
श्री. बा. श.जोशी,पुणे
फोन : २५४३८७७५
अध्यात्म आणि खगोल विज्ञानाचे सुसंवादित्व

आधुनिक विज्ञान आता विश्वापलिकडच्या अस्तित्वाचे समग्रतेने एकात्म दर्शन घेत चालले आहे. भारतीय तत्वज्ञान्यांनी कट केलेल्या वेदांतातील मूळ सिद्धांताचा सारभूत भाग आणि विज्ञानातील नवनवीन शोधांत एकतानता व सुसंवादित्व कसे आहे हे दर्शविण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. हा ग्रंथ घरोघरी जावा, अध्यात्मवादी लोकानी अंधश्रदेविना, तर विज्ञानवादींनी आपल्या बुद्धीला पाखंडी न बनवता व अंधश्रद्धानिर्मूलनवादी लोकांनी श्रद्धेला अंध न बनवता वाचावा हीच इच्छा आहे.

शरद नाईक कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद
मुबई
`विज्ञान-मित्र' हा अभ्यासक्रम मराठी विज्ञान परिषदेने १९८४ मध्ये सुरू केला. याची उद्दिष्टे व आखणी यासंबंधीची सविस्तर माहिती प्रास्ताविकात आली आहे. या अभ्यासक्रमाची एकूण सात सत्रे दोन वर्षांच्या कालावधीत घेण्यात आली. या सात ८ वी ते १० वी वयोगटातील ११० मुलांनी भाग घेतला आणि यातील ८३ मुलांनी हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. अभ्यासक्रम राबवताना बरेचसे शालेय विज्ञान शिक्षण साहित्य गोळा झाले. तसेच विज्ञान-मित्र अभ्यासक्रम एक ते सातपर्यंतचा प्रवास निरनिराळ्या टप्प्यांवर बदलत गेला. याची कल्पना `विज्ञान-मित्र परीक्षा' व `विायाया कपा'या वपावन येइल. हा सर्व प्रयोग वाचकांसमोर मांडण्याचा प्रपंच या प्रायोगिक आविष्कार या पुस्तकामार्फ़त केला आहे.

 

भारतीय विचार साधना पुणे


भारताची ही गौरवशाली विज्ञानपरंरपरा मराठी वाचकांसमोर आणण्याचे महात्वपूर्ण काम या ग्रंथाने होणार आहे. विद्युतशाखा, पदार्थविज्ञान, धातुविज्ञान, विमानविद्या, गणितीशाखा, कालगणना, खगोलविज्ञान, स्थापत्यशाखा, रसायनशाखा, वनस्पती, कृषी, प्राणी, आरोग्य, ध्वनि इ. विषयीच्या विज्ञानात, भारतीयांनी केलेले संशोधन व मांडलेले सिद्धांत आजही जगाला उपयुक्त आहेत. भारतीयांची विज्ञानक्षेत्रातील ही अजोड कामगिरी निश्चितच या ग्रंथातून वाचकांसमोर येईल आणि भारतीयांना नकारात्मक भावनेतून मुक्त करण्यासाठीही या ग्रंथाचा उपयोग होईल.


प्रा. उदय क्षीरसागर
प्रा. उदय क्षीरसागर यानी नया पिढीला रुचेल व पचेल अशा पद्धतीने मोरोपंतांच्या काव्याचा व जीवनाचा परिचय या ग्रंथात करुन दिला आहे. अध्ययन, पांडित्य, अपूर्व शब्दकला, प्रवाही अभिव्यक्ती, वाणीतील विनम्रता, यववी कुटुंबजीवन, स्वाभिमान, ईश्वरशरणता हे मोरापंतांचे गुणविशेष नया पिढीपर्यंत नेले पाहिजेत या तळमळीतून सिद्ध झालेले ` नववे रत्न ' परिणामकारक झाले आहे.
- विवेक घळसासी

 
अनुराधा गानू
ग्रंथाली प्रकाशन

अजब तुझे सरकार
मूळ इंग्रजी कविता - प्रभाकर देवधर मराठी अनुसर्जन - अनुराधा गानू
`अजब तुझे सरकार ' मधील अनुराधा गानू याचा मराठी अनुवाद वाचताना देवधर यांच्या कवितांचे अंतरंग माझ्या मनात अधिक उत्कटपणे उलगडत गेले...
... देवधर यानी राजीव गांधींवर लिहिलेल्या मोजक्याच कवितातून राजीव गांधींचे जिवंत आणि प्रत्ययकारी चित्र उभे राहते.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color