कुल-मंडल-कट्टा पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

नाव जरा विचित्र वाटेल, पण आज 'कॉलेज-कट्टा', 'ज्येष्ठ नागरिक कट्टा', यासारख्या नावाने 'कट्टा' स्थापन करून त्याद्वारे नेट वरून आपली मते इतरांना कळविण्याकरितां आणि त्यावर प्रतिक्रिया लिहिण्यास उद्युक्त करण्यासाठीं forum केलेले आहेतच. त्याच चालीवर हा 'कुल-मंडल-कट्टा' कार्यान्वित व्हावा ही माझी इच्छा. यावरील हा पहिला लेख मी लिहिला असला तरी त्यावर वाचकांकडून प्रतिक्रिया येत गेल्या तरच हा प्रयोग सफल होईल.

'कुल-मंडल-कट्टा' ही संकल्पना जरा विस्तारानें सांगायची, म्हणजे 'आपल्या कुलाचा ताजा 'कुलवृत्तान्त' असावा' अशी इच्छा असणार्‍या त्या कुलमंडलातील उत्साही मंडळींना त्यांच्या इच्छा, अनुभव, अपेक्षा, अडचणी आदि सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठीं सोयिस्कर असे 'संकेतस्थळ' (वेब-साइट). यातील लेख वाचून अनेक समविचारी मंडळींना उर्मी येऊन त्यावर प्रतिक्रिया किंवा स्वतन्त्र लेख लिहिण्याची इच्छा व्हावी हाच त्यामागचा हेतू.

कोणत्याही कुलसंमेलनांत किंवा त्यातील मंडळाच्या मीटिंगमध्ये 'कुलवृत्तान्ताचे काय?' हा प्रश्न सहाजिकच येतो; त्याची प्रगती जाणण्याची इच्छा असते.
कुलवृत्तान्त ही काही विशिष्ट जातीची/धर्माची मक्तेदारी नाही. इच्छा असलेल्या कोणत्याही समूहाला त्यांचा 'कुलवृत्तान्त' करतां येतो. आज अ. भा. मच्छीमार संघटना देखील त्यांचा वेब-कुलवृत्तान्त तयार करीत आहे. विसाव्या शतकांत सुमारे 100 कुलांचे (आडनावांचे) कुलवृत्तान्त तयार झालेले आहेत. त्यावेळीं उपलब्ध असलेल्या प्रकाशनाच्या एकमेव मार्गानें म्हणजे 'छापूनच' ते झालेले आहेत. काहींच्या दोन-तीन आवृत्त्याहि निघालेल्या आहेत. आज 21 व्या शतकांत 'छपाई व्यतिरिक्त' प्रकाशनाचे (वेब-पब्लिशिंग सारखे) इतरही मार्गही उपलब्ध आहेत. बहुतेक कुल-मंडळांचे बरेचसे सदस्य 'ज्येष्ठ नागरिक' असल्यामुळे त्या सर्वांना या नवीन तन्त्रज्ञानाबद्दल माहिती असेलच असे नाहीं. म्हणून तन्त्रज्ञानाची माहिती करून घेऊन कुलवृत्तान्ताची नवीन आवृत्ती कशी प्रकाशित करायची, याचा सर्व दृष्टीनें सांगोपांग विचार करण्याची (मीटिंगमध्ये चर्चा करण्याची देखील) गरज आहे. निव्वळ 'याची सर्व जबाबदारी आमच्या मंडळानें अमुक-अमुक गृहस्थांवर सोपविली आहे' असा निर्णय कुलमंडळानें घेणे म्हणजे अंधारांत तीर मारून आपली जबाबदारी झटकण्यासारखेच होईल.

आजतागायत निरनिराळ्या कुल-मंडळंनीं त्याच्या बाबतीत कायकाय केलेले आहे याचा एक आढावा...
अ] 2 कुलांचे वेब-डेटाबेस असलेले कुलवृत्तान्त आज नेटवर तयार आहेत. ते कोणालाही(त्रयस्थालाही) पाहतां येतात.
'www kulvrutant.com' या संकेतस्थळावरून ते दोन्ही मिळतात. ('नातू' आणि 'करमरकर)
ब] 2 कुलवृत्तान्तांच्या छापील आवृत्तींच्या पानांच्या PDF/JPG files त्यांच्या संकेतस्थळावरून पाहतां येतात.
क] 2 कुलवृत्तान्तांच्या साइट 'site under rennovation/construction/checking) असल्यामुळे दिसत नाहीत.
ड] 5 कुलवृत्तान्ताच्या वेब-साइटसाठीं मुखपृष्ठ आणि नाव नोंदविण्याचा फॉर्म साइटवर दिसतात पण प्रत्यक्ष
कुलवृत्तान्त तयार नाही. वेब-साइट करण्याचा त्यांचा मानस दिसतो.
इ] 15 कुलमंडळांनीं त्यांचे Yahoo groups करून त्यावर कुलबांधवांना नोंदणी करण्यासाठीं आवाहन केलेले आहे.
फ] सुमारे 70-80 कुल-मंडळांनी त्यांच्या कुलवृत्तान्ताच्या नवीन आवृत्तीआसाठीं अजून वेब-पब्लिशिंग चा पर्याय
प्रत्यक्ष विचारांत घेतलेला दिसत नाही; किंवा त्या दृष्टीने नेटवर काहीच चिन्हे दिसत नाहीत.
अर्थात् ज्या कुलमंडळांनी अजून त्यांच्या कुलवृत्तान्ताची पहिली आवृत्ती सुध्दा तयार केलेली नाही, अशा असंख्य
मंडळांचा या सर्वेक्षणांत अंतर्भाव ही झालेला नाही.

या सर्व समुद्रमंथनातून कित्येक वाचकांच्या मनांत बरेच मूलभूत प्रश्न येतील; त्याची उत्तरे शोधणे आवश्यक
आहे. सर्वांना पडणारे हे काही प्रश्न; आणि माझ्या दृष्टीने ही त्यांची उत्तरे. वाचकांची त्याला सहमती नसली तर त्यांनी
त्यांच्या प्रतिक्रिया अवश्य लिहाव्यात किंवा ई-मेल/फोन/पत्र याद्वारे माझ्याबरोबर संपर्क साधावा.

1) प्रत्येक आडनावाचा 'कुलवृत्तान्त' असायलाच पाहिजे कां?---
ज्या शंभर एक कुल मंडळांनीं त्यांचा(निदान पहिली आवृत्ती) कुलवृत्तान्त तयार करण्यासाठीं अपार परिश्रम घेतले,
ते कोणत्या तरी ध्येय्यांने प्रेरित झालेले होते. त्यांच्या कष्टांचे फलित म्हणून तो कुलवृत्तान्त रूपी इतिहास त्यांच्या
पुढच्या पिढीला मिळाला आहे. तो जतन करून त्यांत वाढ करणे हे पुढच्या पिढ्यांचे कर्तव्यच आहे. त्या इतिहासा
पासून त्याना बोध तर घेता येईलच; पण त्याचबरोबर कुलातील पूर्वजांच्या DNA वरून त्यांचा 'कल' ही कळेल.
2) नवीन आवृत्ती काढतांना ती छापील स्वरूपांत असावी कीं वेबवर असावी?---
गेल्या शतकांत छपाईला पर्यायच नव्हता, आज आहे. त्याचे फायदे-तोटे आणि खर्च याचा विचार करून काय तें
ठरवावे. जुन्या आवृत्ती नंतर पुढची आवृत्ती जर 25-30 वर्षांनंतर निघणार असेल तर मधल्या काळातील बदल
'एकदम 25-30 वर्षांनंतर इतरांना कळले तरी काय हरकत आहे', असा विचार असेल तर छापणे सगळ्यात सोपे.
(हल्लीच्या पुस्तक छापण्याच्या खर्चाचा अगोदर छापखान्यातून अंदाज मात्र जरूर घ्या)
3) PDF/JPG files द्वारे शेवटची आवृत्ती नेटवर टाकली कीं काम होईल कां?---
'आम्ही कुलवृत्तान्त नेटवर टाकला' (आम्ही हाय-टेक झालो) असे निव्वळ समाधान मिळण्यासाठीं तें चालेल;
पण काम होणार नाही. नेटवर वाचण्याकरतां लोकांना एक 'ऐतिहसिक दस्ताइवज' ठेवून चालणार आहे कां, हा प्रश्न
स्वत:ला विचारा. या अगोदरच्या पॅरा मध्ये या मुद्द्याचा विचार केलेलाच आहे.
4) Yahoo groups किंवा genealogy site registration करून प्रश्न सुटेल कां?---
याचे उत्तर शोधण्यासाठीं प्रथम Yahoo groups चा वापर कसा होत आहे हे जरा नीट पहावे. ज्या 15+ कुलांचे
'याहू ग्रुप' नेटवर आहेत (काही जणाचे तर 5-7 वर्षांपासून आहेत) त्यावर रजिस्टर झालेल्या त्यांच्या कुलबांधवांची
संख्या 300-400 च्या आतच आहे. मुख्यत्त्वे करून परदेशीं रहाणारे कुलबांधव त्यावर नोंद करतात असे दिसते.
(हें चुकीचे असेल तर कृपया मला तसे दाखवून द्या) या सर्व आडनावांचे छापील कुलवृत्तान्त देखील असून त्यांत
प्रत्येकी निदान 5000 ते 10000 व्यक्तींची नोंद आहे. एका कुलाच्या कुलवृत्तान्ताच्या नवीन आवृत्तीचें समारंभपूर्वक
उद्‍घाटन याच वर्षीं मुंबईला झाले; त्यावेळीं त्यांनी छापील आवृत्तीतील 11000 नोंदींचा अभिमानपूर्वक उल्लेख केला;
आणि त्याच बरोबर 'त्यांच्या वेब-साइटवर groups मार्फत 300 जणांनीं नोंद केल्याचेंही सांगितले. (दुर्दैवानें त्या
300 जणांचा उरलेल्या 11000 कुलबांधवांबरोबर काय संबंध आहे, वंशावळीत ते कोठे आहेत; याचा संदर्भही नाही)
काही वर्षांपूर्वी 'आम्हाला भारत आणि इंडिया असे दोन वेगळे देश चालणार आहेत का?' असा प्रश्न चर्चेत होता;
त्याची येथे आठवण करून द्यावीशी वाटते.
थोडक्यात म्हणजे हा खटाटोप करतांना कुलबांधवांची 10000 आणि 300 मध्ये फाळणी तर होत नाही नां, हें पहावे.
5) वेब डेटाबेस करून कुलवृत्तान्त करणे म्हणजे काय?---
वेबवर (नेटवरील एखाद्या साइटवर) असलेल्या डेटाबेसमध्ये कुलातील प्रत्येक (हयात आणि मृत देखील) व्यक्तीची
संपूर्ण नोंद करून तो जगात कोठूनही कोणालाही त्याच्या संगणकावर किंवा smart mobile वर पहातां येणे, हें
ज्या पध्दतीनें शक्य होते, असें संगणकीकरण करणे. यातील पहिला (static) भाग कुलवृत्तान्ताच्या शेवटच्या
छापील आवृत्तीवरून डेटा-एण्ट्री करून करतां येतो; आणि नंतरचा (dynamic) भाग वेळोवेळीं On-Line-Entries
करून (कुलमंडळातील ट्रेन्ड मॅनेजर्सना) साइटवर वारंवार अपडेट करतां येतो. सर्व कुलबांधव जितक्या तत्परतेनें
त्यांच्या कुटुंबातील बदल कळवतील आणि मॅनेजर जितक्या तत्परतेनें ते साइटवर अपडेट करतील तितका तो
कुलवृत्तान्त ताजा राहूं शकतो. ही नेहमीच ताजी आवृत्ती असते. नवीन आवृत्ती काढावीच लागत नाही.
6) असा वेब-कुलवृत्तान्त कोठे करून मिळतो?---
असा वेब-कुलवृत्तान्त दुकानातून/बाजारातून विकत मिळत नाही. कुलमंडळातील निदान 3-4 जणांनी या कार्याला
वाहून घ्यावे लागते. योग्य असा संगणक व त्यासाठीं लागणारी संगणक-प्रणाली (ट्रेनिंगसकट) विकत घ्यावी
लागते, पण ती वापरून डेटा-एण्ट्री चे काम कुल-मंडळातील काही स्वयंसेवकांना करावे लागते. जर तसे स्वयंसेवक
कुलांत उपलब्ध होत नसतील तर ते काम करण्याची सेवा (service) योग्य अशा डेटा-एण्ट्री ऑपरेटर कडून विकत
घ्यावी लागते. तसेंच जर वेळोवेळीं On-Line-Entries साठीं कुल-मंडळातील कोणी मॅनेजर उपलब्ध होणार नसेल
तर तशी सेवा देखील विकत घेतां येते; मात्र या सेवा विकत घेऊन ते काम वेळेवर करण्याची जबाबदारी
कुलमंडळातील काही व्यक्तींना (पाळीपाळीने सुध्दा) पार पाडावी लागते, भविष्यकाळांतही पार पाडावी लागेल.
7) मराठीत कीं इंग्रजीतून?---
गेल्या पाच वर्षांपासून हा प्रश्नच येत नाही. संगणकावर कोणतीही माहिती मराठीतून (कोणत्याही भारतीय भाषेतून)
लिहितां आणि वाचतां येते. सर्व Unicode utf-8 मध्ये standerdized असल्यानें फॉण्ट डाउनलोड करण्याचा वगैरे
प्रश्नच उद्‍भवत नाही. आधुनिक संगणकाच्या OS मध्ये हें विनामूल्य असते. गेल्या शतकातील सर्व कुलवृत्तान्ताची
पुस्तके मराठीतूनच होती. सध्या नेटवरील दोन (वेब-डेटाबेस असलेले) कुलवृत्तान्त देखील मराठीतूनच आहेत.
याशिवाय त्याचे पुढचे पाऊल म्हणजे नवीन येणार्‍या सुविधे द्वारे मराठीत डेटाबेस असलेले कुलवृत्तान्त सुध्दा केवळ
एक बटण क्लिक करून संपूर्ण इंग्रजीत वाचतां येतील. छापलेले पुस्तक मात्र दुसर्‍या भाषेतून वाचतां येणे शक्य
नाही. परदेशीं वाढलेल्या नवीन पिढीला देवनागरी लिपी वाचतां येत नसली, तरी त्याच कुलातील बहुसंख्य लोकांना
एकतर इंग्रजी वाचतां येत नाहीं किंवा ते फार कठिण जाते. ही नवीन येणारी सुविधा दोघांचे हित पाहूं शकेल.
8) आमच्या कुलाच्या लोकांकडून माहितीचे फॉर्मच भरून येत नाहीत; मग पुढे कसे जाणार?---
हा प्रश्न खरे म्हणजे सगळ्याच कुलमंडळांना भेडसावत असतो. पूर्वी छापायला देण्याअगोदर सर्व मंडळांच्या हातात
जेवढे फॉर्म असतील, तेवढ्यांचीच नोंद होवूं शकत होती. हा 'Human Problem' असला तरी वेब डेटाबेसमध्ये
आतां तो पूर्णत: तन्त्रज्ञानाच्या द्वारे सोडविला जाऊं शकतो. तुमच्या कुलातील एका शाखेच्या पूर्वजांची जरी
गेल्या 8-10 पिढ्यांची माहिती उपलब्ध असली तरी चालते. समकालीन पिढ्यांचे rationalization करून सर्व
घराणी तेवढ्याच मागे इतिहासांत नेतां येतात. ज्यांच्याबद्दल सध्या काहीच माहिती नसते त्यांची नोंद 'अज्ञात'
म्हणून सुरवातीला करतां येते आणि जसजशी माहिती मिळत जाईल तसतशी त्या जागीं (अगदी सवडीने) त्या
व्यक्तींची नोंद होवूं शकते. केवळ एका घराण्याची सविस्तर माहिती मिळाली कीं कामाला सुरवात करतां येते.
9) कुलाचा इतिहास जास्तीत जास्त किती पूर्वीपर्यंतचा लिहिता येतो?---
कोणत्याही कुलवृत्तान्तांतांत सर्वांचा संबंध अगदी एका 'मूळ पुरूषा' पर्यंत नेतां येणे अशक्य आहे. साधारण पणे
20 ते 80 वेगवेगळी घराणी पहिल्यापासून असतात. हा काळच (10-15 पिढ्या म्हणजे 200-300 वर्षांपर्वीचा)
यापूर्वीच्या पिढ्यातील व्यक्तींची नावे कोणाला आठवणेही शक्य नसते आणि त्यासंबंधीचा कागदोपत्री उल्लेखही कोठे
नसतो. 'त्र्यंबकेश्वर' च्या देवळातील उपाध्यायांच्या जुन्या नोंदी कदाचित् थोडे जास्त इतिहासांत डोकवूं देतात (मात्र
बर्‍याच नोंदी मोडी लिपीत आहेत) पण यांत वाइट वाटून घेण्यासारखे काहीच नाही. पाश्चात्य जगांत तर 3-4
पिढ्यांच्या अगोदरची कोणालाच माहिती नसते. त्यांच्या मानानें आपण खरोखर भाग्यवान आहोंत.
10) इतर कुलांच्या मानानें आमच्या लोकांना पूर्वीची पिढ्यांची फारशी माहितीच नाही त्याचे काय?---
कारणे काहीही असली तरी पूर्वजांबद्दल फारशी माहिती नोंदविलेली नाही, किंवा ती कोणाच्या स्मरणशक्तीत नाही;
अशी परिस्थिती उद्‍भवणे शक्य आहे. अगदी अशी परिस्थिती आली तरी आधुनिक तन्त्रज्ञानाकडून त्यावर काही
उपाय आहेत. जे 100 कुलवृत्तान्त गेल्या शतकापासून तयार आहेत, त्यापैकी बर्‍याच कुलांत एकमेकाशीं विवाह
संबंध येत गेले आहेत. (पूर्वीच्या काळांत जातीबाहेर फारशी लग्ने होतच नसत) यामुळे ज्यांच्या पूर्वीच्या पिढ्याची
फारशी माहिती नाही अशा xxx कुलातील मुलगी विवाहानंतर, ज्यांचे नोंदीकरण चांगले ठेवलेले आहे अशा घरांत
सासुरवाशिण म्हणून आली तर तिचा उल्लेख तेथे 'सासुरवाशिण' म्हणून होवून तिच्या 'माहेरचा' उल्लेखही त्यांत
अंतर्भूत असतो. त्याचप्रमाणे त्या कुलातील माहेरवाशिणी xxx कुलांत सासुरवाशिणी म्हणून गेल्यासही नोंद होते.
यामुळे xxx कुलांत ज्यांचा उल्लेखही नाही अशा मुलींची माहिती व त्याचे वडील/नवरा यांची माहिती ज्या कुलाचा
कुलवृत्तान्त तयार आहे अशा दुसर्‍या कुला-कडून आपोआप मिळूं शकते. वेब-कुलवृत्तान्त असतील तर यासाठीं पाने
चाळण्याची ही गरज नाही; स्क्रीनवर चारीही खिडक्यातील माहिती एकाच वेळीं दिसूं शकते.
आत्तां वेबवर असलेल्या 'नातू' व 'करमरकर' यांचे कुलवृत्तान्त पाहून याची खात्री करून घ्या.

या दहा प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी आणखी काही प्रश्नही उपस्थित होतील. वाचक येथेच (या कट्ट्यावर) लेख
लिहूं शकतील; किंवा लवकर उत्तराची अपेक्षा असेल तर माझ्याबरोबर संपर्क साधूं शकतील. 'Elescher8' नावाने
वेब कुलवृत्तान्ताची संपूर्ण संगणक-प्रणाली मी स्वत: लिहून, आत्तांपर्यंत 'नातू' आणि 'करमरकर' यांचे कुलवृत्तान्त
त्याद्वारे वेबवर तयार करून दिले आहेत. हे सर्व, प्रणालीबद्दलची माहिती, माहितीपत्रक इ. सर्व वाचकांना साइटवर
'www.kulvrutant.com' या संकेतस्थळावर पाहतां येईल.
रवी ओक. 29 आदर्श सोसायटी, सातारा रोड, पुणे 411037. Tel: (020) 2426-5648
ई-मेल: ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा. ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा. ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.

 
पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color