पंढरपूर पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

मी कशास जाऊ दुरी
माझं घरच पंढरपुरी ----

मायबाप विठू रखुमाई
त्यांच्या मायेचा आसरा लई
कष्ट दु:खात छत माझ्या शिरी
मी कशास जाऊ दुरी ---- १

मनमिळाऊ ही घरधनी
नाही कलह तिच्या मनी
जिवाभावाची साथ संसारी
मी कशास जाऊ दुरी ---- २

भाऊबंधांचा मेळावा गावी
प्रति प्रसंगी साथ ते देती
मुलेबाळे बागडती दारी
मी कशास जाऊ दुरी ---- ३

प्रभुभक्ति चा भजनमळा
जसा आनंदे डोले सोनसळा
तुझ्या कृपेच्या पडतात सरी
मी कशास जाऊ दुरी ---- ४

श्री. सुरेश अदवंत, हैदराबाद  

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color