स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow कविता arrow सृष्टीने पायात बांधली नुपूरे
सृष्टीने पायात बांधली नुपूरे पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 
 

सृष्टीने पायात बांधली नुपूरे .......
रूणझुण रूणझुण निनादती,
किती किती नवसूर छेडीती,
आभाळातून अखंड मोद झरे !
सृष्टीने पायात बांधली नुपूरे.

वेलींवर अन् पानांवर,
फुलांसहित कळयांवर,
आपोआप उमटती थेंबचित्रे !
सृष्टीने पायात बांधली नुपूरे.

कड्या-कपारीतून फुटती मधुघट,
गिरी-शिखरांवर शुभ्र इंद्रघट,
धारानंदी दु:ख नुरे !
सृष्टीने पायात बांधली नुपूरे.

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color