स्वागतकक्ष arrow सय arrow मैत्रबन
मैत्रबन पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   
मैत्रबन - पुस्तकपरिचय
लेखक - प्रवीण दवणे
नवचैतन्य प्रकाशन
प्रथमावृत्ती - जानेवारी २००९
मूल्य - रु. ३२५/-
पृष्ठसंख्या - २००

कथा कादंबर्‍यातला तोचतोचपणा पाहून मनाला अतिशय उबग आला होता. त्यामुळे नवीन विषयावरच्या, नवीन धाटणीच्या पुस्तकाच्या शोधात असताना प्रवीण दवणे यांचं ‘ मैत्रबन ’ हे पुस्तक हाती आलं अन्‌ मला ते कधी एकदा वाचून काढते आहे असं झालं. जुजबी स्वरूपाचं घरातलं काम करून पुस्तक व मी अशी साथसंगत सुरू झाली. संगीत व संगीतकारांच्या डोहात मी पुरती बुडून गेले. तहानभूक विसरून त्या आठवणींच्या खजिन्यात गुंग होऊन गेले.

गडद हिरवट काळसर रंगाच्या पार्श्वभूमीवर कोवळ्या, तजेलदार पालवीच्या फिकट पोपटी रंगाचा तानपुरा, व त्या भावमधुर संगीतानं तेजाळून निघालेल्या एकांतात बसलेला साधक, असे मन भान टाकणारे आकर्षक मुखपृष्ठ पाहून कोणत्याही संवेदनाशील वाचकाचे मन मोहित झाल्यावाचून राहणार नाही. वयाच्या दहाव्या वर्षापासून कवितेची साथ लाभलेल्या लेखकाच्या कवितांना संगीताची अमोल जोड देणार्‍या अनेक संगीत दिग्दर्शकांबरोबर काम करताना त्याला आलेले विविध प्रकारचे अनुभव आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. गायन, वादन, लेखन इत्यादी प्रकारची कोणतीही कला असो, तिची जीव ओतून साधना केल्याशिवाय यशप्राप्ती होत नाही हा सर्वमान्य सिद्धान्त कलावंतांच्या सहवासात असल्याशिवाय मनात उतरत नाही.
प्रस्तुत पुस्तकात लेखकाने आपल्याला विशेषत्वाने भावलेल्या २५ संगीत दिग्दर्शकांच्या स्वभावातले गुणविशेष, त्यांची संगीतसाधनेची धाटणी आपल्या मृदु, मुलायम, अचूक शब्दात गुंफून आपल्या जीवनाचा मखमली गालिचा वाचकांसमोर उलगडून दाखविला आहे. संत, पंत व अभिजात अशा सर्व प्रकारच्या कवितांचे लेखन करणे ही कला लेखकाला सहजसाध्य झाली आहे याची प्रचिती ठिकठिकाणी येते. काहीजणांना लेखन करण्यासाठी ठराविक जागा, टेबलखुर्ची, एकांत वा अशाच काही गोष्टी लागतात असे ऎकिवात आहे. पण लेखक - प्रवीण दवणे - मात्र याला अपवाद दिसतात. त्यांना गीतलेखनासाठी संगीत दिग्दर्शकाबरोबर काम करताना नंदू होनपांची दहा बाय बाराची खोली असो, विलास जोगळेकरांची मुंबईच्या चाळीतली दोन खोल्यांची जागा असो, गॅरेज असो वा भप्पी लहिरींचा आलिशान बंगला असो काहीच फरक पडत नाही.

दत्ता डावजेकर, श्रीनिवास खळे, यशवंत देव, विश्वनाथ मोरे, दशरथ पुजारी अशा प्रकारचे ज्येष्ठ दर्जाचे संगीत दिग्दर्शक तसेच नंदू होनप, दीपक पाटेकर, श्रीधर फडके यांसारखे तरल प्रतिभेचे संगीत दिग्दर्शक यांची साथ लाभली. सिनेगीतांच्या निमित्ताने अनिल मोहिले, अशोक पत्की, अरूण पौडवाल यांच्यसमवेत काम करण्याची संधीही मिळाली.

गीताचा कुठलाच प्रकार कधी कमी मानला नाही. नवीन लिहिण्याचा प्रयोग फसला तर फसला पन प्रयोग करीत राहण्यातलं जिवंतपण हीच या जन्मीची श्रीमंती असते. याची पुरेपुर जाणीव लेखकाला असल्याने समोरच्या संगीत दिग्दर्शकाच्या पसंतीला उतरेतो, विविध प्रकारचे मुखडे लिहिण्याचा, अथक प्रयत्न करण्याच्या जिद्दीमुळे दैदिप्यमान यशाची शिखरे पादक्रांत करण्याचे अवघड कार्य साध्य झालेले दिसते. म्हणूनच विश्वनाथ मोरे नावाच्या पाठशाळेनम त्यांना जे अनमोल देणं दिलं त्यामुळे लेखकाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

धगधगणार्‍या या ज्वालेतून
कुणी मला सोडवा, सोडवा
आगीचा बंब जरा बोलवा
तुम्ही आगीचा बंब जरा बोलवा ॥

भक्तिगीते लिहिणार्‍या दवणेसाहेबांच्या हातून अशी ठसकेबाज लावणी ‘ ठकास महाठक’ या चित्रपटासाठी लिहिली गेली. अनेक संगीत दिग्दर्शकांबरोबर आनंदानं काम केले तरी त्यातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून प्रवीण दवणे यांना श्रीधर फडके अधिक भावतात असे खुद्द त्यांनीच नमूद केले आहे. गीतरचनेतील नवनिर्मितीचा सर्वाधिक आनंद त्यांना श्रीधर फडके यांच्याबरोबर काम करताना मिळाला.

नवीन लिहिण्याचा प्रयोग फसला तर फसला पण प्रयोग करीत राहण्यातलं जिवंतपण हीच या जन्मीची श्रीमंती असते. याची पुरेपुर जाणीव लेखकाला असल्याने समोरच्या संगीत दिग्दर्शकाच्या पसंतीला उतरेतो, विविध प्रकारचे मुखडे लिहिण्याचा, अथक प्रयत्न करण्याच्या जिद्दीमुळे दैदिप्यमान यशाची शिखरे पादक्रांत करण्याचे अवघड कार्य साध्य झालेले दिसते.

आपण ज्या संगीतकलाकारांचे नुसते प्रसार माध्यमातून दर्शन घेत असतो त्यातील २५ संगीत दिग्दर्शकांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात राहून अनुभलेले प्रसंग वाचताना आपणास त्याचा प्रत्यय येतो. यातच या पुस्तकाचे यश आहे.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color