चिरनूतन पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

निळयाभोर लाटांवर,
शुभ्र रंगावली,
सरत्या सूर्यप्रकाशात,
चमके वाळू ओली ! वाऱ्यासंगे थरथरती,
सुरूबनांतून सावल्या,
कुठल्या स्वप्नांसाठी,
दिवसभर झुरल्या ! दूरांत सागरवक्षावर
संथ नाव तरंगे,
पलिकडे क्षितीजावर,
नभ धरणीला बिलगे !

फिरे चराचरावर,
सूर्याचा प्रेमळ हाथ,
उन्ह पिऊन तवानी,
लाल लाल पायवाट !

बंदरावरली लगबग,
सारी आता विरेल,
काळोख पांघरून एकला,
ध्यानस्थ सागर उरेल !

चिरनूतन ही सायंकाळ
पिऊ दे क्षण न् क्षण तोवरी,
उद्या, परवा, रोज,
फिरूनी येणार जरी !

 

 

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color