स्वागतकक्ष arrow कुलवृत्तांत arrow लेख arrow कुलवृत्तांताची गरज
कुलवृत्तांताची गरज पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

भारतीय कुटुंबव्यवस्था ही भारतीय समाजाचा मुख्य आधार आहे. वंशपरंपरा व नातेसंबंध यांची माहिती एकत्रितपणे सुसंगतपणे मांडणे म्हणजे कुलवृत्तांत. अनेक वर्षे अथक प्रयत्न करून, निरनिराळया ठिकाणी राहणाऱ्या कुलबंधूंची अधिकृत माहिती जमा करणे, ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे वंशावळीचा व घराण्यांचा इतिहास लिहिण्याचे फार मोठे कार्य अनेकांनी केले आहे. आजच्या धकाधकीच्या युगात असे कार्य करणे अशक्यप्राय झाले आहे.

प्रत्येकाला आपल्या कुळाचा अभिमान असतो आपल्या पूर्वजांबद्दल आदरयुक्त प्रेम असते. कुलदैवतावर श्रद्धा असते. आपल्या पूर्वजांचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा असते. घराण्यातील रीतीरिवाज, सणवार यांची माहिती पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत विनासायास एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जायची. आता विभक्त कुटुंबपद्धतीमुळे, शिक्षण व नोकरीसाठी राहण्याचे स्थान बदलल्याने अशी माहिती मिळण्यास अडचणी येतात.
कुलवृत्तांतात ही सर्व माहिती असते. मात्र असे कुलवृत्तांत फारच थोड्या घराण्यात तयार झाले आहेत. आणि ते तयार झाल्यावर काळ लोटला की त्यातील माहितीने नूतनीकरण न झाल्याने त्याचा फक्त ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उपयोग शिल्लक रहायचा.

सध्याच्या संगणक युगात वेबसाईटवरून नित्य नूतनीकरणाची सोय उपलब्ध असल्याने अद्ययावत कुलवृत्तांत केव्हाही कोणासही कोठेही पाहता येणे शक्य झाले आहे. या सुविधेचा वापर करताना फक्त आवश्यक तेवढ्याच माहितीचा कोश तयार झाला तर तो जास्त उपयुक्त ठरेल.

ज्ञानदीप फौंडेशनने सर्व जाती धर्मातील लोकांसाठी असे मराठी संकेतस्थळ करण्याचे योजिले होते. यात आतापर्यंत प्रसिध्द झालेल्या कुलवृत्तांतांची माहिती तसेच प्रत्येक कुलासाठी स्वतंत्र विभाग ठेवून त्यात कुलदैवत, कुळाचार, संक्षिप्त इतिहास व मान्यवर कुलबंधूंची व्यवसायानुसार वर्गीकरण करून माहिती (नाव, शिक्षण, व्यवसाय, गाव, फोन, इ-मेल.) देण्याचा विचार होता. स्वतंत्र संकेतस्थळाऎवजी आता मायमराठीवरच कुलवृत्तांत हा नवा विभाग सुरू केला आहे.

याचा उपयोग आपल्या कुलबांधवांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी तसेच परस्पर संपर्क वाढण्यासाठी होऊ शकेल. या विभागाचा आपल्या कुलवृत्ताची माहिती देण्यासाठी सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती.

 
< मागील

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color