स्वागतकक्ष arrow मराठी भाषा arrow संगणकावर मराठीत कसे लिहायचे?
संगणकावर मराठीत कसे लिहायचे? पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

ध्वनी आधारित युनिकोड लिपीमुळे संगणकावर मराठी लिहिणे आता अगदी सोपे झाले आहे. इंटरनेटवरून ‘गमभन’ किंवा ‘बराहा’ संगणक प्रणाली डाऊनलोड करून संगणकावर स्थापित केली की आपला संगणक मराठीत लेखन करण्यास वापरता येतो.
१) पुण्याचे श्री. ओंकार जोशी यांनी आपल्या www.gamabhana.com या संकेतस्थळावर गमभन संगणक प्रणालीच्या साधी व प्रगत अशा प्रती मोफत डाऊनलोडसाठी ठेवल्या आहेत.
http://www.gamabhana.com/files/gamabhana_lite_package_090327.zip
http://www.gamabhana.com/files/gamabhana_pro_package_090327.zip
त्यातील साधी प्रत डाऊनलॊड करून अनझिप करावी.

तयार झालेल्या गमभन फोल्डरमधील index.html उघडावी व मधल्या रकान्यातील माहिती पुसून मराठी अक्षरे टाईप करण्यास सुरुवात करावी. 'F1' की दाबल्यास मराठी अक्षरे व इंग्रजी पर्याय यांचा तक्ता पाहता येतो.

अं अ: अँ आँ
a aa/
A
i ee
/I
u uu/
oo/U
e ai o au aM/
a.N
a: E O EM/
E.n
OM/
O.n
ka kha ga gha Ga cha/
Ca/ca
chha
/Cha
ja jha/
za/Za
Ya
Ta Tha Da Dha Na ta tha da dha na
pa pha/
fa/
Fa/
Pha
ba bha/
Bha
ma ya ra la va/
Va/
wa/
Wa
sha
क्ष ज्ञ क़ ख़ ग़ ज़ ड़ ढ़ फ़ य़
shha/
Sha
sa ha La xa/Xa
/kSha
dnya
/jna
ka.q kha.q ga.q ja.q Da.q Dha.q fa.q ya.q
श्री र्‍हा र्य हूँ क्यूँ
Rlu Ru RU a~ a^ H HH shrI AUM Rhaa rya hEMU kyEMU
मॢ मॣ मृ मॄ म् म॑ म॒ म॓ म॔ म़
mRlu mRlU mRu mRU ma.h maq maqq maQ maQQ maJ/
maK/
ma.q
0 1 2 3 4 5 6 7 8 9

गमभन संगणकप्रणाली ब्राऊजर(इंटरनेटदर्शक) वर आधारित असल्याने आपल्या संगणकावर विंडोज किंवा लिनक्स अशी कोणतीही ऑपरेटिंग सिस्टिम असली तरी वापरता येते.
२) विंडोज (Windows XP) साठी मायक्रोसॉफ्टने आशियायी भाषांसाठी नवी सुविधा दिली आहे. ती कार्यांन्वित केल्यास बराहा या संगणक प्रणालीचा वापर करून मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील सर्व प्रकारांमध्ये मराठीचा वापर करता येतो.
अ) विंडोजवर भाषा सुविधा स्थापित करणे
खाली दाखविल्याप्रमाणे कंट्रोल बटन दाबून रिजनल लॅंग्वेज सेटींग पर्याय निवडावा. Windows XPची सीडी वापरून भाषा सुविधा स्थापित करावी. मराठी पर्याय निवडावा. ध्वनीआधारित कीबोर्ड साठी Hindi Traditional पर्याय निवडावा.


ब्) www.baraha.com या संकेत स्थळावररून बराहा युनिकोड २.० डाऊन लोड करावे व अनझिप करून संगणकावर स्थापित करावे.

बराहा डायरेक्ट वापरल्यास ऑफिस मधील सर्व प्रकारांमध्ये मराठी वा इंग्रजी लिहिता येते.
जर विंडोजची भाषा सुविधा स्थापित केली नसेल तरीही केवळ बराहा पॅड मध्ये मराठी लिहिता येते.

आपल्या संगणकावर युनिकोड फॉंट स्थापित मराठी अक्षरे न दिसता विचित्र चिन्हे दिसतात अशावेळी सी डॅक ने विकसित केलेला mangal.ttf हा युनिकोड मराठी फॉंट आपल्या संगणकावर स्थापित करावा. ( फॉंटफोल्डरमध्ये कॉपी करावा)

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color