खालील गीतरामायणाच्या ध्वनीचित्रफितीतील गायक व माझे परममित्र डॉ. भालचंद्र वासुदेव करंदीकर, यांचे २७ जून २०१० रोजी वयाच्या ६६व्या वर्षी निधन झाले. संगीताचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण न घेता केवळ सरावाच्या जोरावर त्यानी भावगीत गायनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. सुधीर फडके यांच्यावर त्यांची असीम भक्ती होती. आपल्या भावगीत कार्यक्रमाचॆ सर्व उत्पन्न ते सुधीर फडके यांच्या ’सावरकर चित्रपट निर्मिती’ प्रकल्पास देत असत.
गेली काही वर्षे ते अंथरुणाला खिळून होते. त्यांचा आवाजही त्यांना सोडून गेला होता. पण त्यांनी सादर केलेली कला या संकेतस्थळाद्वारे सर्वांना कायम आनंद देत राहील.
ज्ञानदीप परिवार व व्यक्तिशः माझ्यातर्फे त्यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली.
- सुरेश वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
खालील ध्वनीचित्रफिती त्यांनी शिकागो येथे सादर केलेल्या गीतरामायण कार्यक्रमावर आधारित आहेत.