५९. नांदेड १९८५ शंकर पाटील पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

ज्ञानाची गंगा खेड्यापर्यंत जावी, ग्रामीण भागातही साहित्याची आवड निर्माण व्हावी, तिथल्या सुप्त कलागुणांनाही वाव मिळावा, ग्रामीण विभागातून पुढं येणार्‍या नवोदित लेखकांना पोषक वातावरण लाभावं, त्यांच्या विचारांना चालना मिळावी यासाठी ‘गाव तिथं ग्रंथालय’ ही योजना आखली जाऊन ती अमलांत आणावी.
आजच्या नियतकालिकांच्या जगातला सगळा व्यापारी झगमगाट बघितला, उत्तान शृंगारावर आणि पांचट, पसरट, ढोबळ विनोदांवर बेतलेले लेखन पाहिलं म्हणजे वाटतं नव्या लेखनप्रयोगाला इथं कोण जवळ करणार ? समजा कोणी जवळ केलंच तर त्याकडं कोणाचं लक्ष जाणार ? खपाऊ मालाच्या ढिगात त्याला कोणाची दाद मिळणार ? अशा या जगात उमेदीचा नवा, प्रयोगशील लेखक आपलं ‘स्वत्व’ कसं आणि किती काळ टिकविणार ? कदाचित कालाच्या ओघात आपलं ‘स्वत्व’ सोडून त्या बाजारात तोही मिसळून जाईल, ही शक्यताच अधिक दिसते. यावर उपाय म्हणून एखादा कायम स्वरुपाचा आर्थिक निधी आपण उभारू शकतो.
एकजिनसी समाजाचं स्वप्न साकार करायचं असेल तर मातृभाषेच्या एकाच माध्यमातून एकाच प्रकारचं शिक्षण सर्वांना उपलब्ध होणं अगत्याचं आहे. सर्व विषयांत, सर्व स्तरावर मराठी माध्यमातून शिक्षण देणारं व संशोधन करणारं एक स्वतंत्र मराठी विद्यापीठ स्थापन झालं पाहिजे.

 
< मागील

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color