स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ५१ - ६० arrow ५५. १९८१ फेब्रु. अकोला - गो. नी. दांडेकर
५५. १९८१ फेब्रु. अकोला - गो. नी. दांडेकर पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
गो. नी. दांडेकर- अशिव ते गिळून जावं आणि शिव असेल ते जनांसाठी माडावं, हा धडा ज्ञानोबानं शिकवला. कामक्रोधादि विकार सर्वत्र सारखेच आहेत. कुणाचाही त्यात अपवाद नाही. पण जे भलं असेल त्याचा जयकार करावा. ‘उत्कट भव्य तेंचि घ्यावे’ आणि ‘हे तो प्रचीतीचे बोलणे’ ही लेखनामागची सूत्रं आहेत. ऎतिहासिक कादंबरी लिहिणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. भाषा हे सृष्टिकर्त्याने मानवाच्या हाती सोपविलेले उत्कृष्ट शस्त्र आहे. भाषेच्या शब्दांच्या साहायाने साम्राज्यही जिंकता येतात. भाषा हे दुधारी शस्त्र आहे. ते तारतंही आणि मारतंही. ते आपल्या सर्वांच्या व्यवहारातलं सर्वोत्तम माध्यम आहे. साहित्य म्हणजे केवळ ललित असे नव्हे. तर ते सर्वांगाने विकसित व्हायला हवे. विज्ञानविषयक साहित्य मराठीत निर्माण व्हायलाच पाहिजे. अनेक उत्तम ग्रंथांचे अनुवाद मराठीत व्हावेत. वाचकांच्या अभिरुचीला उत्तम वळण लावायची जबाबदारी वाचनालयांवर असते. ती त्यांनी पार पाडावयास हवी. परराज्यातल्या मराठी वाचक, लेखक यांच्याकडेही लक्ष पुरवावे.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color