वन्दे मातरम् बंगाली- मराठी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क मिलिंद प्रभाकर सबनीस   

॥ वन्दे मातरम् ॥
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्‌ सस्यशामलां मातरम्‌‍ ।
शुभ्रजोत्स्नापुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं
सुहासिनीं सुमधुर भाषिणीं सुखदां वरदां मातरम्‌ ॥ १ ॥
वन्दे मातरम् ।
कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले,
कोटिकोटी-भुजैर्धृत-खरकरवाले, अबला केन मा एत बले ।
बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरम्‌ ॥ २ ॥
वन्दे मातरम् ।
तुमि विद्या, तुमि धर्म तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणा: शरीरे बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारई प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे मातरम्‌ ॥ ३ ॥
वन्दे मातरम् ।
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणीं कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्‌
नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरम्‌ ॥ ४ ॥
वन्दे मातरम् ।
श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां
धरणीं भरणीं मातरम्‌ ॥५ ॥
वन्दे मातरम् ।

-----
मराठी भावार्थ
हे माते ! मी तुला वंदन करतो.
पवित्र जलाने युक्त, फळांनी समृद्ध, मलय पर्वतावरून येणार्‍या वार्‍याने शीतल जाणवणार्‍या आणि भसघोस पिकामुळे श्यामल दिसणार्‍या माते !
मी तुला वंदन करतो.
धवल चांदण्यामुळे पुलकित झालेली रात्र, फुलांनी बहरलेले ताटवे तुझी
शोभा वाढवतात. हसतमुख, मधुरभाषी, सुख देणार्‍या, वरदान देणार्‍या माते !
मी तुला वंदन करतो. ॥ १ ॥
कोटी, कोटी कंठांमधून एकमुखाने निघणार्‍या घोषणांमधून
तसेच कोटी, कोटी हातांमध्ये तळपणार्‍या शस्त्रांमधून तुझ्या सामर्थ्याचा साक्षात्कार होत असताना, तू तर ‘बहुबल धारिणी’ आहेस.
शत्रूंचा नि:पात करून आम्हांला तारनारी आहेस. तुला मी नमस्कार करतो.
हे माते मी तुला वंदन करतो. ॥ २ ॥
तुझ्या ठयी सर्व विद्या आहेत. तूच आमचा धर्म आहेस.
तूच आमचे हृदय आहेस. तूच आमचे मर्म आहेस. तूच आमच्या देहातील प्राण आहेस. माते! तूच आमच्या बाहूंमधील शक्ती आहेस.
माते! तूच आमच्या हृदयांमधील भक्ती आहेस.
मंदिरा, मंदिरांतून प्रस्थापित प्रतिमा हे माते तुझ्याच आहेत.
हे माते मी तुला वंदन करतो. ॥ ३ ॥
दाही हातात दहा शस्त्रे धारण करणारी दुर्गा तूच आहेस.
कमल-पुष्पांमध्ये वावरणारी कमलाही तूच आहेस.
विद्यादायी सरस्वतीची वाणी तूच आहेस. मी तुला नमन करतो.
ऎश्वर्य देणार्‍या माते, पवित्र जलाने युक्त माते! तुला वंदन असो. ॥ ४ ॥
भरघोस पिकामुळे श्यामल दिसणार्‍या माते !
सरल-चारित्र्याने आणि प्रसन्न हास्याने-भूषित माते!
तूच आम्हांला धारण करतेस. तूच आमचे पोषण करतेस.
हे माते मी तुला वंदन करतो. ॥ ५ ॥

संदर्भ :
वंदे मातरम्‌ : काल-आज-उद्या, मिलिंद प्रभाकर सबनीस,
सांस्कृतिक वार्तापत्र भारतमाता विशेषांक २६ जानेवारी २००२

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color