स्वागतकक्ष arrow काव्यदीप arrow बाल arrow * चिमुकली चिऊताई *
* चिमुकली चिऊताई * पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

चिमुकली चिऊताई
कंटाळयाचे नाव नाही
पंखाचा पदर बांधून
एकसारखी कामाची घाई ---- १

काय खाऊ काय खाऊ
म्हणत असतात कावळे भाऊ
संपत नाही हट्ट
म्हणून झाले आहेत मठ्ठ ---- २

पोपटदादा हिरवागार
चोच याची बाकदार
तिखट्ट मिरची खातो
तरी गोड गोड बोलतो ---- ३

कुत्रोपंत आलात काय ?
शेपूट हलवून सांगतात काय ?
ताजी पोळी वरती साय
खूप आवडती म्हणताय काय ? ---- ४डाऊनलोड करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color