मराठी भाषा
शुद्धलेखनाचे अठरा नियम | शुद्धलेखनाचे अठरा नियम |
|
|
|
|
शुद्धलेखनाचे अठरा नियम
अनुस्वाराचे नियम नियम १: १.२तत्सम शब्दातील (= संस्कृतातून मराठी जसेच्या तसे आलेले शब्द) अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण (म्हणजे पुढे येणाऱ्या व्यंजनांच्या वर्गातील पंचमवर्णाने) लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे. १.३ पर-सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार) देऊनच लिहावेत. १.४ अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर-सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते. १.५ काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो किंवा कधीकधी तो उच्चार होतही नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये. नियम २ : २.२ 'ज्ञ' पूर्वीचा नासोच्चारही शीर्षबिंदूने दाखवावा. नियम ३ : ३.२ आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे. नियम ४: वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे व न होणारे अनुस्वार देऊ नयेत.या नियमानुसार 'घरें, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं' हे शब्द 'घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, काच, जो, घरी' असे लिहावेत. नियम ५: इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा. ५.२ 'परंतु, यथामति, तथापि' ही तत्सम अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत. ५.३ व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे ऱ्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत. ५.४ 'आणि' व 'नि' ही मराठीतील दोन अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत. ५.५ सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम ऱ्हस्वान्त शब्द असेल (म्हणजेच मुळात संस्कृतात ऱ्हस्वान्त असेल) तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे. दीर्घान्त असेल तर ते दीर्घान्तच लिहावे. ५.६ 'विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन्' यांसारखे इन्-अन्त शब्द मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या 'न्' चा लोप होतो व उपान्त्य ऱ्हस्व अक्षर दीर्घ होते. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले असता (म्हणजेच समासातील पहिला शब्द असता) ते ऱ्हस्वान्तच लिहावेत. नियम ६: मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यातील उपान्त्य इकार किंवा उकार ऱ्हस्व असतो. तत्सम शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असले तरी त्यातील उपान्त्य इकार आणि उकार मूळ संस्कृतातल्याप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ ठेवावा. नियम ७: तत्सम शब्दातील शेवटले अक्षर अ-कारान्त असले तरी त्यातील उपान्त्य इकार किंवा उकार मूळ संस्कृतातल्याप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ ठेवावा. ७.२ मराठी शब्दांतील जोडाक्षरापूर्वी इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व असतात.उदाहरणार्थ: कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक.मात्र तत्सम शब्दांतील जोडाक्षरांपूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारांनी आढळतात. ते मूळ संस्कृतप्रमाणेच लिहावेत. मराठी व तत्सम शब्दांतील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास ती अक्षरे सामान्यतः ऱ्हस्व असतात. मराठी व तत्सम शब्दांतील विसर्गापूर्वीचे इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व असतात. नियम ८: अपवाद - दीर्घोपान्त्य तत्सम शब्द. ८.२ मराठी शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्यरूपात उपान्त्य ई-ऊ यांच्या जागी 'अ' आल्याचे दिसते. मात्र पहिले अक्षर ऱ्हस्व असल्यास हा 'अ' आदेश विकल्पाने होतो. ८.३ शब्दाचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'ई'च्या जागती 'य', आणि 'ऊ'च्या जागी 'व' असे आदेश होतात. ८.४ पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी 'सा' असल्यास त्या जागी उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो. ('श्या' होत नाही.) ८.५ पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी 'जा' असल्यास उभयवचनी सामान्यरूपात तो तसाच राहतो (त्याचा 'ज्या' होत नाही). ८.६ तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर 'क' चे किंवा 'प'चे द्वित्व असेल तर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे होते. ८.७ मधल्या 'म'पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी अनुस्वारविरहित होते. ८.८ ऊ-कारान्त विशेषनामाचे हे सामान्यरूप होत नाही. ८.९ धातूला 'ऊ' आणि 'ऊन' प्रत्यय लावताना शेवटी 'व' असेल तरच 'वू' आणि 'वून' अशी रूप तयार होतात, पण धातूच्या शेवटी 'व' नसेल तर 'ऊ' आणि 'ऊन' अशी रूपे तयार होतात. नियम ९ : पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना यातील 'पू' दीर्घ लिहावा. नियम १०: 'कोणता, एखादा' ही रूपे लिहावीत. 'कोणचा, एकादा' ही रूपे लिहू नयेत. नियम ११: 'हळूहळू, चिरीमिरी' यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरे व चौथे ही अक्षरे दीर्घान्त लिहावीत. परंतु यांसारखे पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत. नियम १२: एकारान्त सामान्यरूप या-कारान्त करावे. अशा रूपांऐवजी 'करणेसाठी, फडकेंना' अशी एकारान्त सामान्यरूपे करू नयेत. नियम १३: लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे. अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत. नियम १४: 'क्वचित्, कदाचित्, अर्थात्, अकस्मात्, विद्वान्' यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द व्यंजनान्त (म्हणजेच पायमोडके) न लिहिता 'क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान' याप्रमाणे अ-कारान्त लिहावेत. कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे लेखन करावे. इंग्रजी शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अ-कारान्त अक्षर आता व्यंजनान्त (म्हणजेच पायमोडके) लिहू नये. नियम १५: केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत. तदनंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरून छापावे. नियम १६: 'राहणे, पाहणे, वाहणे' अशी रूपे वापरावीत. 'रहाणे, राहाणे; पहाणे, पाहाणे; वहाणे, वाहाणे' अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र 'राहा, पाहा, वाहा' यांबरोबरच 'रहा, पहा, वहा' अशी रूपे वापरण्यास हरकत नाही. नियम १७: 'ही' हे अव्यय तसेच 'आदी' व 'इत्यादी' ही विशेषणे दीर्घान्तच लिहावीत. नियम १८: पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्व-दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे. |
| < मागील | पुढील > |
|---|








