बाबा कदम पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
लेख सूचक
बाबा कदम
पान 2
वाचकप्रिय, रसिक बाबा कदम दि. १८-९-२००६ ला शिवाजी सावंत पुरस्काराने सन्मानित होत आहेत- प्रलय, स्वीकार, इन्साफ अशा सुमारे ७५ कादंबर्‍यांचा लोकप्रिय, वाचकप्रिय लेखक म्हणून वीरसेन आनंदराव कदम असं एखाद्या इतिहासकाराला शोभेल असं भरभक्कम नाव असलं तरी ते आपल्या वाचक परिवारात `बाबा कदम' म्हणूनच परिचित आहेत. त्यांच्या कथा, कादंबर्‍यात मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर बोली भाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स इ. हमखास येणारच याचं आश्चर्य वाटत नाही.

बाबांचा जन्म, ४ मे १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. त्यांचे वडिल अक्कासाहेब महाराजांचे स्वीय सचिव होते. त्यामुळेच एक खानदानी आदब त्यांच्यामध्ये जाणवते अन् नकळत कुर्निसात करण्यासाठी हात पुढे होतो, मान अदबीनं झुकते. संस्थांनी वातावरणातच बाबांचे बालपण गेले. त्यांचे वडिल रेसकोर्सवर अधिकारी म्हणूनही कार्यरत असत. त्याचाच परिणाम बाबांच्या कथालेखनात झाला. त्यांची `अजिंक्यतारा' कथा रेसकोर्सच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या बालपणातच वडिलांचा मृत्यू झाला. प्राथमिक शिक्षण वसतिगृहात राहून झाले. स्वावलंबी जीवनाचे धडे त्यांनी आश्रमातच घेतले. इथेच त्यांची चित्रकलेशी ओळख झाली. पुढे ते राजाराम कॉलेजमधून पदवीधर झाले. याच काळात बाळ गजबरांचाही परिचय झाल्याने चित्रकलेचे संस्कार त्यांच्यावर झाले. घरच्या परिस्थितीमुळे पुढे त्यांनी एस. टी. महामंडळात काही काळ सेवाही करतानाच शिक्षणाची ओढ त्यांना गप्प बसू देत नव्हती. ते १९५४ मध्ये एल.एल.बी.झाले. फौजदारी वकील डी.एस.खांडेकर यांच्याकडे ते काम करु लागले १९५९ साली ते सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले. १९५९ ते १९८७ पर्यंत सरकारी वकील म्हणून २८ वर्षे काम करुन ते १९८७ साली सेवानिवृत्त झाले. याच त्यांच्या न्यायालयीन कामकाजाचाही त्यांच्या लेखनावर प्रभाव पडलेला दिसतो. 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color