बंधुमाधव पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
लेख सूचक
बंधुमाधव
पान 2
१९४० नंतर जे दलित लेखक डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचा विचार घेऊन आघाडीवर आले त्यात बंधु माधवांचे नांव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. कथा, कादंबर्‍या, नाटके त्यांनी लिहिली. `आम्ही ही माणसं आहोत’ या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहाची एका वर्षात तिसरी आवृत्ती काढावी लागली. `विखारी भाकरी' ही त्यांची पहिली कथा. त्यात अस्पृश्यतेचे चटके, जाती व्यवस्थेवर प्रकाश टाकला आहे. `गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करुन देण्यासाठीच आपण लिहित आहोत' अशी प्रतिज्ञा घेऊनच ते वाटचाल करु लागले. `महारवतनी कथा' ही त्यांनी मराठी कथेला दिलेली देणगीच मानली जाते.

उध्वस्त झालेल्यांच्या दु:खाचे तर ते एक वाटेकरीच होते. माणूस आणि संवेदनाक्षम मन असलेला लेखक त्यांच्यात अस्वस्थ होता. त्यातून त्यांचं लेखन झाले. सांगली गावाने मराठी जीवनाला काय दिले नाही, राजकारणात रंगणारी आपल्या कर्तृत्वाने क्षितीज स्थापणारी उत्तुंग व्यक्तिमत्वाची माणसे दिली. तसेच डफावर थाप पडताच घुंगरांच्या तालावर देहभान हरपणार्‍या कलांवंतिणी दिल्या. भाऊ फक्कड, पठ्ठे बापूराव, पवळा बापूराव कुपवाडकर या तमासगीरांची जिंदगीच याच सांगलीने वाहिली. बंधुमाधवांचा साहित्य प्रपंच या भूमीशी निगडित आहे. सांगली आणि सांगलीवाडी यांच्या मधोमध वाहणारी कृष्णा या दोही काठांना समृध्द करते. पोलीस खात्यातील नोकरी सोडल्यावर बंधुमाधवांनी राजकारणात प्रवेश केला तर त्यात ते यशस्वी ठरले नाहीत. त्यांच्या लेखनात सामाजिक गुलामगिरी झुगारुन देणारी भाषा माणुसकीच्या लढ्याने शिकविली होती.

दलितांच्या सर्वस्पर्शी जीवनाचा वेध घेणार्‍या त्यांच्या अंतर्मनात प्रवेश करणार्‍या कितीतरी कथा बंधुमाधवांनी लिहिल्या. त्यांच्या सशस्त्र लेखणीचे पुढील कित्येक तरुण दलित लेखकांना प्रेरणा दिली यात शंका नाही. सांगलीवाडीच्या दक्षिण भागातील समाजमंदिरालगतच त्यांचं घर. त्यांचे नातेवाईक तेथेच आजही स्थायिक झाले आहेत. 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color