वसंत बापट पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
लेख सूचक
वसंत बापट
पान 2
`माझीया जातीचे मज भेटो कोणी, ही माझी पुरवून आस, जीवीचे जिवलग असे भेटला की दोघांचा एकच श्वास' अशी कवितेवर निष्ठा असणारा कवि म्हणून वसंत बापट ओळखले जात. राष्ट्रसेवादलाच्या मुशीत घडलेल्या वसंत बापट यांचा `बिजली' हा पहिला काव्यसंग्रह सेतु, अकरावी दिशा, सकीना, मानसी हे त्यांनंतरचे. त्यांच्या प्रतिभेची विविध रुपे रसिकांनी, वाचली, अनुभविली. पुढे तेजसी व राजसी हे दोन काव्य संग्रह ना. ग. गोरे यांच्या हस्ते प्रकाशित झाले.

सतत चाळीस वर्षे आपल्या काव्य वाचनाने महाराष्ट्र गाजविणार्‍या बापट, विंदा आणि मंगेश पाडगावकर या कवींनी रसिकांना आपल्या कवितेन अक्षरश: वेडं केलं. पु.ल. यांनी एकदा वसंत बापट यांना, `बापट, बापट रोज गाणं थापट' म्हटलं पण वसंत बापटांनी मात्र आपलं गाणं `थापटत' असतांना कधी-कधी `थोपटलं' ही आहे असं म्हणंत. ते म्हणंत, नव्या कवितेतून गाणे हरविले आहे, तरुणाईने गाणी गुंफायला हवेच. बापट हे केशवसुतांच्या मालिकेतील कवी होते. देशात घडणार्‍या घटनांची दखल घेऊन मत मांडले पाहिजे असे मानणारे ते कवि होते. कवींच्या संस्कृति समृध्दीमुळे त्यांच्या कवितेत भाववलयं उठत राहतात. माणसांबद्दलचे प्रेम आणि सामाजिक जिव्हाळ्यातून बापट यांचे मन घडले होते. त्यांच्या कवितेला अनेक घुमारे आहेत. रचनाशुध्दता, विलक्षण शब्दचापल्य हेवा वाटावा अशी शैली ही बापट यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. अंतर्गत लय सांभाळून त्यांनी अनेक रचनाप्रकार हाताळले.

`लोक सागराचे भान असलेला लोकांचा कवी' हीच त्यांची खरी ओळख त्यांचा जनसंपर्कही प्रचंड. सतत माणसांत रहायला त्यांना आवडायचे मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांना अनेक मित्र मंडळी होती. तीही वेगवेगळ्या स्तरांतली, त्यांच्या मित्र मंडळीत पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, जेष्ठ नेते नाथ पै, मधु दंडवते, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे असत. महाराष्ट्र्सेवादलातल्या सर्वांना, `साधने'त त्यांच्याबरोबर काम करणार्‍या सहकार्‍यांनाही ते आपले वाटतात. त्यांचे मराठी, संस्कृत भाषेवरचे प्रभूत्व आणि प्रेम तर सर्वश्रुतच होते. पण त्यांचे इंग्रजीवरही प्रभूत्व होते. `शतकाच्या सुवर्णमुद्रा' हे त्यांचे अखेरचे पुस्तक. ५५ वर्षे प्रा.बापट यांनी सातत्यांने दर्जेदार लेखन केले. विविध साहित्यप्रकार त्यांनी हाताळले असले तरी कविता हाच त्यांचा आत्मस्वर होता. रविकिरण मंडळाचे संस्कार त्यांच्या वरही झाले होते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग होता. मात्र शिक्षक हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष उल्लेखनीय पैलू म्हणावा लागेल. 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color