विष्णुदास भावे पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
लेख सूचक
विष्णुदास भावे
पान 2
सांगलीचा नाट्यक्षेत्रात फार मोठा दबदबा होता. येथील नाट्य रसिकांनी नाट्याची चळवळ जोपासली. मराठी रंगभूमीचे जन्म स्थान म्हणून सांगली शहर परिचित आहे. विष्णुदास यांनी १८४३ मध्ये राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये मराठातील पहिले नाटक `सीता स्वयंवर' साकारले. त्यानंतर पहिली सांगलीकर नाटक मंडळी आकारली. १८५४ मध्ये विष्णुदासांनी `राजा गोपीचंद' हे हिंदी नाटक साकारले आणि ते हिंदी रंगभूमीचे जनक म्हणूनच ओळखले जाऊ लागले. त्यांनी एकूण ५२ नाटके लिहिली. त्यात प्रामुख्याने पौराणिक नाटके आहेत.

कर्नाटकातील भागवत मंडळी यांचा `खेळ' पाहून सांगलीचे संस्थानिक थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी आपल्या पदरी असणार्‍या अमृतराव भावे यांच्या विष्णू या बुद्धिमान मुलाला भागवत नाटक मंडळीतील नाटकाप्रमाणे खेळ करण्याची आज्ञा केली. त्यांची आज्ञा प्रमाण मानून १८४३ साली सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये मराठीतील पहिले नाटक `सीता स्वयंवर'नाटकाचा जन्म झाला. त्यासाठी त्यांनी कानडी नाट्यपरंपरेत आवश्यक तेथे बदल केले. भाव्यांनी स्वत:च नवीन पदाची रचना केली. `सीता स्वयंवर आणि अहिल्योध्दार ` आख्यान श्रीमंतांपुढे सादर केले. हेच मराठीतील पहिले नाटक मानण्यात येते. इथेच मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. यावेळी खुद्द विष्णुदासांनी `नाट्यकवितासंग्रह' या नावाने १८८५ मध्ये संग्रहित केले.`सीतास्वयंवर' मराठी रंगभूमीवर आले तो दिवस होता ५ नोव्हेंबर १८४३ चा.म्हणूनच हा दिवस नाट्यपंढरीत `मराठी रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो.

५ नोव्हेंबर १८४३ रोजी विष्णुदासांनी `सीता स्वयंवर' या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग सांगलीत केला.पण त्यापूर्वी ते कठपुतळ्यांचे खेळकरीत असत. त्यांनी बनविलेल्या खेळविलेल्या या कठपुतळ्या त्यांच्या निधनानंतर तशाच पेटार्‍या त पडून राहिल्या होत्या व भावे यांच्याकठपुतळी खेळाच्या तीनचार संहिता उपलब्ध आहेत. द्रौपदी स्वयंवर, ढोंगी महंताची नक्कल अशी त्यांची नावे आणि कठपुतळ्या या लाकडी असल्यातरी अतिशय हलक्या होत्या. शक्यतो उंबराच्या लाकडाचा व कागदाचा लगदा या पासून बनविल्या जात. रेखीव आकार, प्रमाणबध्दता असूनही त्या चाकावर बसविलेल्या होत्या. त्या लोंखंडी काठीच्या आधाराने आणि दोरीच्या साह्याने अशा दोही प्रकारे खेळवता येतात. 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color