दीनानाथ मंगेशकर पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
लेख सूचक
दीनानाथ मंगेशकर
पान 2
एक प्रसिध्द गायक, नट, गोव्यात श्री मंगेश देवस्थानचे उपाध्ये- पुजारी, गणेशपंत नवाथे (अभिषेकी) यांचे सुपुत्र. दीनानाथांना बालपणापासून गायनाची आवड, किर्लोस्कर नाटक मंडळीत ताजेवफा, काँटो में फूल अशी उर्दु-हिंदी नाटके बालनट दीनानाथ यांच्या गायनावर किर्लोस्कर मंडळीने चिंतामणराव कोल्हटकरांच्या पुढाकाराने कलकत्यापर्यंत प्रवास झाला. मोहक सतेज मृदा, गौर अंगकांती, भव्य भालप्रदेश रेखीव नेत्र, सुडौल बांधा, कुरळे केस, शांत, धाडसी, लोकसंग्रहाची आवड असणारा स्वभाव ही दीनानाथांची वैशिष्ट्ये !

दीनानाथांचे मूळवतनी नांव देसाई. त्यांच्या घराण्याने देवस्थानच्या रक्षणाकरिता रुद्राभिषेक करवून घेतला म्हणून देसाईचे ते बनले `अभिषेकी`. मा. दीनानाथांचा २९ डिसेंबर १९०० साली `मंगेशी' येथे जन्म झाला. मा. दीनानाथ मंगेशीतून गोमंतकातून लहानपणी बाहेर पडले आणि पुढील काळात `मंगेशकर` बनले.

बालगंधर्व, सवाई गंधर्व, केशवराव भोसले यांच्यासारखे जेष्ठ श्रेष्ठ गायक कलाकार यांच्या काळात हा गायनात आणि अभिनयात तडफ दाखविणारा हा अभिनेता उदयाला आला. मास्टर दीनानाथ यांनी प्रथम `ताजेवफा` या उर्दू नाटकामध्ये काम केले. त्यातील त्यांची `हार जमाना हीरा काहे तेरा काहे को' व `बालम सुरतिया` ही गाणी रसिकांना खूप आनंद देत असत. १९१६ मध्ये `काँटो मे फूल' या नाटकात मा. दीनानाथयांची विनोदी भूमिका केली. त्यांनतरच्या `सुंदोपसुंद` नाटकात `सुविभ्रमा` आणि `पुण्यप्रभावा`तील किंकिणीची दीनानाथांची भूमिका पाहून अच्युत बळवंत कोल्हटकरांनी दीनानाथांना `मास्टर' ही पदवी दिली. आणि हीच बिरुदावली त्यांनी आयुष्यभर मिरविली. 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color