गोविंद देवल पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
लेख सूचक
गोविंद देवल
पान 2
नाट्याचार्यांचा जम १३ नोव्हेंबर १८५५ साली सांगली जवळच्या हरिपुरात झाला. त्याचं शिक्षण हरिपूर, बेळगांव आणि कोल्हापूर येथे झाले. या कालावधीतच त्यांना सरदार्स हायस्कूलमध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांची भेट झाली. त्यातूनच त्यांना नाट्यकलेची स्फूर्ती मिळाली असावी. त्याची कृतज्ञताही ते आपल्या नांदीतून करतात.

`श्री नटनायक चिंतुनी आधी, बळवंता नमितो दुष्कर कामी प्रसाद गुरुचा धैर्य मना देतो `

इथे बळवंत म्हणजे बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर होते. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर देवल आपले बंधू कृष्णाजीपंत यांचेकडे बेळगावला शिक्षणासाठी गेले. नंतर ते राजाराम हायस्कूल, कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्याला काही काळ `बॉटनी'चे शिक्षक होते. १८७६ साली देवलांनी `विधवा दु:खवर्णन या विषयावर कविता करुन बक्षिस मिळविले होते. वयाची १० ते १६ वर्षे गोविंदरावांची हरिपुरात गेली. सांगली हे त्या काळात मराठी रंगभूमीचे सर्वात मोठे केंद्र होते. विष्णुदास भावे यांनी सुरु केलेले पौराणिक नाटक त्या काळात ऐन उत्कर्षाच्या अवस्थेत होते. त्याचाही परिणाम गोविंदरावांच्यावर झाला असावा. त्याबरोबरच त्या काळात सांगलीकर, आणि नूतन सांगलीकर नाटक मंडळी या मंडळीचा दोस्ताना ही गोविंदरावांना पसंत असावा. या सर्वातूनच त्यांचा नाट्याकडे ओढा वाढला. आर्योद्धारकांनी `वेणीसंहारची' रंगावृती देवलांकडून करुन घेतली. पुढे अथेल्लोवरुन `अजितसिंग' या नावाने देवलांनीच केली. वेणीसंहार नाटकात देवलांनी अश्वत्थामाची भूमिका केली होती. तर `अजितसिंग' मध्ये प्रमुख अथेल्लोची भूमिका केली. ही त्यांची भूमिका गाजली. त्यांचे ते नाटक पुण्या-मुंबईत ही गाजले.

१८८१ पुढे शाकुंतल नाटक रंगभूमीवर आले. प्रथम त्यात गाणी नव्हती. पुढे १८८२ साली त्यात देवलांनी गाणी लिहिली. किर्लोस्कर संगीत मंडळाला अभिनय शिक्षणासाठीही गो. ब. देवलांची साथ मिळाली. १८८४ साली ते पनवेलला गेले, गोविंदरावांच्यात हुशारी, ग्रंथ करण्याचे व पदेही करण्याची क्षमता व अभिनयक्षमता असल्याने किर्लोस्कर मंडळीत त्यांना मानाचे स्थान होते. पुनर्विवाहावर `दुर्गा' हे त्याचं पहिलं नाटक. पुढे त्यांनी `मृच्छकटिक` व `विक्रमोर्वशीय `ही नाटके तर लिहिलीच पण शांकुतलमध्ये गौतमीची भूमिकाही त्यांनी केली. पुणे वैभव या वृत्तपत्रातून त्यांनी लेखनही केले. 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color