दीक्षित सर पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
लेख सूचक
दीक्षित सर
पान 2
केशवराव दीक्षित एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व होते. काळी टोपी, काळा कोट, स्वच्छ धोतर, सुदृढ बांधा आणि सावळेपणा हे त्याचं प्रत्यक्षदर्शी रूप. केवळ संस्कृतच्या प्रेमापोटी ते घरी संस्कृतचे वर्ग घेत असत. त्या विशेषवर्गाचे ते कोणत्याही स्वरूपातील मानधन स्वीकारत नसत. आजन्म विद्यार्थीवृत्तीने संस्कृतच्या अध्ययन, अध्यापनाचा वसा त्यांनी घेतला होता. अभिजात संस्कृत ललित साहित्याचे प्रेम आणि चोखंदळ रसिकत्व त्यांच्या ठायी प्रकर्षाने होते.

के. जी. दीक्षितांचा जन्म १२ सप्टेंबर १९०५ चा. मूळ गाव वाळवा तालुक्यातील आष्टा. घरची सांपत्तिक स्थिती चांगली. श्री सदानंद महाराजांच्या सांप्रदायाची दीक्षा वंश परंपरेने दीक्षित घराण्यात होती. त्यामुळे स्वामींबद्दच्या संस्कृत रचना दीक्षित सरांनी केल्या होत्या. अंगी उपजत असलेल्या बुद्धिमत्तेमुळे मराठी, गणित ह्या विषयांची तयारी उत्कृष्टपणे बालपणातच झाली. पुढे त्यांनी मोडलिंब येथे शिक्षकी पेशास प्रारंभ केला. सांगली हायस्कूलचे ते नामवंत विद्यार्थी, विलिंग्डन कॉलेजमधून त्यांनी संस्कृत विषयाची बी. ए. पदवी घेतली. याचे श्रेय ते आपले सांगली हायस्कूलचे शिक्षक श्रीपादशास्त्री देवधर यांना देत असत. पुढे त्यांना प्राध्यापक द्रविडांचे मार्गदर्शन लाभले. एम. ए. च्या अभ्यासासाठी काही काळ ते पुण्यात राहिले. कायद्याचा अभ्यास करण्याचा त्यांचा विचार होता. पण १९३७-३८ साली ते बी. टी. झाले. आणि मोडलिंबच्या शाळेत त्यांनी शिक्षकी पेशाचा प्रारंभ केला. पुढे त्यांना सन्मानाने आणि आग्रहाने सांगलीतील प्रतिष्ठित सिटी हायस्कूलमध्ये मुख्य संस्कृत शिक्षकाचे काम दिले. इथूनच पुढे जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती परीक्षेत दुसरा विद्यार्थी कोण याची चर्चा व्हायची. कारण पहिला विद्यार्थी सिटी हायस्कूलचा हे जणू ठरून गेले होते. १९३५ साली माने या विद्यार्थ्यांने मिळविलेल्या बिडकर संस्कृत शिष्यवृत्तीमुळे संस्कृत शिष्यवृत्तीची परंपरा सिटी हायस्कूल आणि के. जी. दीक्षितांचे नाव महाराष्ट्रभर गाजू लागले. 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color