धोंडो वासुदेव गद्रे पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
लेख सूचक
धोंडो वासुदेव गद्रे
पान 2
काव्यविहारी यांचे बाल्य कृष्णाकाठ आणि दक्षिणी संस्थाने यांच्या सान्निध्यात गेले. काव्यविहारींचा जन्म सांगलीजवळील हरिपूर येथे झाला. हायस्कूलच्या शिक्षणाकरिता त्यांना सांगलीस रोज चालत जावे लागले. उच्च शिक्षणाकरिता त्यांना बुधगावच्या संस्थानिकांचे सहाय्य झाले. पण हरिपूरसारख्या निसर्गरम्य गावात आपलं बालपण घालविण्याचं भाग्य आणि नाट्याचार्य देवलांसारख्यांचा सहवास त्यांना लाभला.

काव्यविहारी हे केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी म्णून ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तिमत्वात रोमँटिक कवी आणि संस्थांनी मामलेदार यांचे मिश्रण होते.`पाळीव पोपटांस `, `जगाचा न्याय`, `उंबरातले किडे ` यासारख्या कविता म्हणजे त्यांचे केशवसुतसंप्रदायित्व होते.

स्वातंत्र्य, समाजक्रांतीचे महत्व गाणार्‍या केशवसुताच्या कवितांप्रमाणेच तुतारी, प्रौढत्वी निज शैशवास जपण्यासही त्यांनी सूचित केले होते. काव्यविहारी यांनी केशवसुतांच्या तीनही सुरात कविता लेखन, काव्य गायनही केले. मंजुळा माझी मैत्रीण, बकुळीखाली, ती रात्र, प्रदक्षिणा या त्यांच्या साध्या जीवनावरील कविताच अधिक सुंदर, स्वाभाविक वाटतात. त्यात आणखी ही एका कवितेचा समावेश करावा लागेल. `खार आणि घार' ही एक त्यांची चांगली कविता. साध्या व शांत जीवनात काव्यमयता पाहणे व जीवनातील विविध अनुभव मोठ्या उत्साहाने मिळविणे व उपभोगणे हे काव्यविहारींच्या जीवनाचे सूत्र होते. 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color