शंकरराव खरात पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
लेख सूचक
शंकरराव खरात
पान 2
साहित्यिक, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, दलित चळवळीतील एक नेते म्हणून खरातांचा परिचय आहे. शंकरराव खरात हेही आटपाडी येथीलच.`तराळ-अंतराळ' हे त्यांचे आत्मचरित्र गाजले. `मी स्वत: म. फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे ` असे ते नेहमी म्हणत. १९५८ ते १९६१ या काळात `प्रबुद्ध भारत ` या नियतकालिकाचे त्यांनी संपादनही केले. १९८४ साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्षही झाले.

`शंकराण्णा तुम्ही असाच साहित्य लेखनात जोर केला पाहिजे. आपण पुढं एकदा माडगूळलाच साहित्य संमेलन घेऊ ` असा त्यांना माडगूळकर बंधूंनी आशीर्वाद व प्रोत्साहनच दिले. त्यांच्या बरोबर प्रा. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, शंकर पाटील, प्रा. द. मा. मिरासदार यांच्या सोबत आचार्य प्र. के. अत्रे, शिरीष पै यांनी त्यांना लेखनासाठी उत्तेजन दिले. १९५७ साली त्यांची नवयुग दिवाळी अंकात, वयाच्या पस्तीसाव्या वर्षी `सत्तूची पडीक जमीन ` नावाची पहिली कथा लिहिली. त्यांनतर रामा महार, बंडा मांग अशा बलुतेदारांच्या बारा कथा नवयुगमध्ये त्यांनी लिहिल्या. त्याला प्रतिसाद खूप मिळाला.

१९५७-५८ मध्ये `माणूसकीची हाक' महार बलुतेदारावर लिहिलेली कादंबरी गाजली. त्यामुळे ते पुढे लेखक म्हणून उदयाला आले. साहित्याच्या ओढीने त्यांनी राजकारणही सोडले. 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color