शाहीर पठ्ठे बापूराव पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
लेख सूचक
शाहीर पठ्ठे बापूराव
पान 2
संत वाङ्मयाबरोबरच शाहिरी वाङ्मयाने मराठी भाषा अधिक समृद्ध केली, लोकप्रिय केली. संतांच्या बरोबरीने महाराष्ट्रात शाहिरी परंपरा अवतरली. अभंग, ओवी, भारुडे, आर्या ह्या संतवाङ्मयाच्या जोडीला शाहिरांची शाहिरी महाराष्ट्रात दुमदूमू लागली. लावणी, पोवाडा, भेदिक, कवने, वग हे वाङ्मय प्रकार लोकप्रिय झाले. शाहीर हे खरे लोकशिक्षकच ! सामाजिक वाईट रुढी, परंपरा, द्वेष यांवर जोरदार हल्ला करुन त्यांनी नीतीमूल्यांचा जोरदार प्रसार केला.

शाहीर पठ्ठे बापूराव हे मराठी शाहिरांचे मुकुटमणी समजले जातात. असंख्य लावण्या, कवने, पदे भेदिक लिहून मराठी सारस्वतात मोलाची भेट घातली. संत साहित्याच्या खालोखाल लावणीतून, अध्यात्माची जाणीव देणारे पठ्ठे बापूराव हे खरे `लावणीसम्राट' होत. `तमाशा ` ही महाराष्ट्राची लोककला. त्यालाच पुढे नाट्यकलेचे आवरण, रुप मिळाले व तमाशा, लोकनाट्य बनला. `वगात’ पौराणिक कथांचा सहभाग करुन तो खेडूत जनतेपर्यंत ह्या पुराणातील कथा पठ्ठे बापूरावांनी पोहोचविल्या.

`माझ्या दोन प्रतिज्ञा आहेत. त्यापैकी एक म्हणजे कागदावर ठेवलेली लेखणी संपूर्ण लावणी लिहून झाल्या खेरीज वर उचलायची नाही. आणि आज मिळविलेला पैसा उद्याकरिता राखून ठेवायचा नाही ` असे पठ्ठे बापूराव म्हणत. 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color