अतिथी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

(घरी आलेल्या अतिथीचा हसतमुखाने पाहुणचार करावा. तहानलेल्यास पाणी व भुकेलेल्यास दोन घास देणे हीच खरी देवपूजा होय.)

अतिथीस तुम्ही सदा देव माना
अतिथीरूपे यशोदेचा कान्हा
अतिथीस तुम्ही सदा देव माना . . . ध्रु. ।।

कधी ये घरासि कुणाला कळेना
दोन गोड शब्दा विसरा परि ना
हसू ओठी थोडे तरी येऊ द्या ना
अतिथीस तुम्ही सदा देव माना . . . १

शुभप्रभाती जरि येई सदना
आनंदे द्यावे चहा-कॉफीपाना
सत्कारणी त्या समयास जाणा
अतिथीस तुम्ही सदा देव माना . . . २

माथ्यावरी जेवि रवि येई गगना
दोन घास अतिथी आला त्यासी द्या ना
थोडे तरी त्या स्मरा तुम्ही कर्णा
अतिथीस तुम्ही सदा देव माना . . . ३

संध्यासमयी गुरूसी स्मराना
अतिथी आला त्या गूळपाणी द्या ना
सहजी त्या शुभआशीषा मिळवाना
अतिथीस तुम्ही सदा देव माना . . . ४

अतिथीच्या जागी आपणास माना
भविष्यकाळातील ठेव जाणा
पुण्याची गणना करी देवराणा
अतिथीस तुम्ही सदा देव माना . . . ५डाऊनलोड करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color