चहा पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

(चहा हे सर्वसामान्यांचे पेय आहे. कवितेत चहाच्या फायद्यातोट्यांची जंत्री केली आहे. सर्वदूर पसरलेल्या चहाची किमया कशी आहे त्याचा आढावा घेतला आहे. )

झोप होता ती सकाळच्या पारी
चहापाने बहु येतसे तरारी
दूध ताजे त्या आणि ती खुमारी
चहा बहुता आवडे जगी भारी . . . ।।१ ।।

चहा नसता ते कुणा दुखे डोके
शरीरगाडीला चहाचीच चाके
अतिथिस्वागत करण्यास चहा चाले
त्याविणा ना जगी पान कधी हाले . . . ।।२ ।।

थंडीमध्ये चव चहाचीही न्यारी
ऊन वारा सरी कोसळत्या भारी
ऋतू असला जरि कोणताही दारी
गंध उधळित ये चहाचीही स्वारी . . . ।।३ ।।

चहा कोणाचे दैन्य ते निवारी
चहा घेता कुणी म्हणे हरीहरी
चहा अतिपाने रोग ये शरीरी
अति होता मति निघुनी जाय दूरी . . . ।।४ ।।

उंच डोंगरी वा दप्तरी कचेरी
गाडी लावीते चहाची हजेरी
भिस्त बहुतांची असे चहावरी
खरी किमया या चहाचीच सारी . . ।।५ ।।



डाऊनलोड करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color