कुणा वाटे पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

(व्यक्ति तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळया गोष्टीत आनंद मिळतो. कुणाकुणाला कशात आनंद मिळतो ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. )

कुणा वाटे आनंद निसर्गात
कुणा येई मजा भोजनात
कुणी घेती रस राजकारणात
सुखही वाटे ते दुजा शिकवण्यात . . .१

गर्क होती ते कुणी सिनेमात
गुंग होती कुणी तसे नाटकात
कुणी होई ते धुंद गायनात
जाई रंगुनी तो कुणी कुंचल्यात . . . २

बुडुनी जाती ते कुणी वाचनात
हौस वाटे ती कुणा खेळण्यात
छंद लागे तो कुणा काव्यलेखनात
दंग होती ते कुणी चिंतनात . . . ३ 

कुणा दिसते सुख कलाकुशलतेत
धन्य म्हणती कुणी धनधान्यसंचयात
सौख्य वाटे परि कुणा चाकरीत
सुखी राही कुणी गोरगरीबीत . . . ४

सुखही वाटे ते कुणा निंदण्यात
नसे मजला परि रागही मनात
सत्यवाणी ज्या वसे ती मुखात
जगी दुर्मिळ नर असा पाहण्यात . . ५डाऊनलोड करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color