चष्मा पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

(चष्मा म्हणजे उतारवयातील व्यक्तींची एक गरजेची वस्तू झाली आहे. त्यातच भर म्हणजे विस्मरण. त्यामुळे अशा आजीआजोबांच्या म्हणजे अस्मादिकांच्या चष्म्याच्या बाबतीत होणाऱ्या गमतीजमती चष्मा या कवितेत मांडल्या आहेत.)

आजी आजोबा दोघेजण
चष्म्याची मुळी न राही आठवण
आजीची सारखी एकतारी
चष्मा कुठे शोधू तरी . . . ।।१ ।।

चष्म्याची त्यांच्या गंमत न्यारी
कोठेही विसावे चष्म्याची स्वारी
उशाशी कधी तरी टीव्हीवरी
कधी तर भेटे शेजारच्या घरी . . . ।।२।।

कोठेही येती त्याला विसरून
परि चैन पडेना त्यावाचून
टेबलावरून नि फळीवरून
गंमत पाही ही चष्मा हसून . . . ।।३ ।।

हातात घेऊन चष्मा म्हणती
शोधू कुठे मी सांगाती
चष्म्याचा करिती सदा गजर
ध्यास लागता भेटे ईश्वर . . . ।।४ ।।डाऊनलोड करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color