पुंडलीक पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

(सुखात आणि दु:खातही मनाचा समतोल ढळू न देता आनंदी वृत्तीने राहणाऱ्या व्यक्ती विरळाच असतात. अशाच व्यक्तीविषयी मनात आलेले विचार व्यक्त करण्यासाठी हा कविताप्रपंच केला आहे.)

आईची सेवा केली तुवा 
पुंडलीकाच्यापरी
दु:खाची सल, मनात तरी
हसू चेहऱ्यावरी . . . ।।१ ।।

एकही क्षण कामाविण
घालविशी ना वाया
लहान थोर, आप्त इष्ट
साऱ्यांवरी माया . . . ।।२ ।।

स्मरणी असताी, संतजनांच्या
सांगितलेल्या गोष्टी
तवरूपाने, तेचि संत
पुन्हा जन्मा येती . . . ।।३ ।।

आनंदाच्या चांदण्या असती
जगती ठायी ठायी
परि नजर त्यासी शोधण्याची
नसे सकला ठायी . . . ।।४ ।।

दु:खाचे डोंगर शिरी असता
सदा सुखी राहणे
दुसऱ्या कोणा जमेल का हो
कधी असे वागणे? . . . ।।५ ।।



डाऊनलोड करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color