कल्पनेची भरारी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

(कल्पना चावलाने भारताचे नाव जगाच्या इतिहासात कोरून ठेवले. अवकाशयानातून पृथ्वीवर परतताना घडलेली दु:खद घटना ही सर्वांना ठाऊक आहे. आपल्या कर्तृत्वाने उज्वल झालेली कल्पना चावला तरूण पिढीचे स्फूर्तिस्थान ठरली. या कवितेद्वारे तिला श्रद्धांजली वाहिली आहे. )

शुक्राच्या चांदणीपरि आकाशी
चमकून गेलिस कल्पना तशी
कल्पना नव्हती कुणाला ऐसी
नियतीची क्रू र थट्टा कैसी . . . . ।।१ ।।

कल्पनाशक्तीत विलीन होसी
जगताच्या तू कणाकणाशी
शौर्यगाथा ही गातील तुझी
देशी नि परदेशी . . . . ।।२ ।।

कार्याने तव प्रेरणा मिळेल
साऱ्या युवकांसी
पुढील पिढीचे स्फूर्तिस्थान
तूच खरी होसी . . . . ।।३ ।।

कल्पनांचे पंख लेऊन
आकाशी भराऱ्या घेसी
स्मरण करील जग तूचि
महिला अविनाशी . . . . ।।४ ।।

साऱ्या जगाचा दीपस्तंभचि
होऊनी बसलीसी
अंतरिक्षाच्या इतिहासी
अमर होऊनी जासी . . . . ।।५ ।।

अज्ञानाचा ध्यासच देईल
मानवा ज्ञानराशी
कार्य तुझे इतुके मोठे
उठतील फिनिक्स पक्षी . . . . ।।६ ।।

अंतरिक्षी भारतदेशा तू
उच्चपदा नेलेसी
नतमस्तक होतील सारे
तुझिया चरणांच्यापाशी . . . . ।।७ ।।



डाऊनलोड करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color