स्वागतकक्ष arrow सांगावा arrow सांगावा arrow सद्गुणांचे पुतळे
सद्गुणांचे पुतळे पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

गृहलक्ष्मीमधि खरेच दिसता
सद्गुणांचे जणु पुतळे
आंनदाचे पडती सडे अन्
समाधान ना दूर पळे . . . ।।१ ।।

सारे आपण सुखात राहू
वादविवादा कधी न करू
एक तीळही सातजणामधि
सुखात वाटुनिया घेऊ . . . ।।२ ।।

अशी धारणा मुळात असता
पर्णे पुष्पे हो तैशी
भाजी-भाकरी आनंदाने
खाता येई तृप्ती तशी . . . ।।३ ।।

उडुनी जाता जरी पाखरे
ओढ तयांना घरट्याची
किमया ही खरी मला वाटते
गृहलक्ष्मीच्या त्यागाची . . . ।।४ ।।

संसाराच्या वटवृक्षातळी
पुत्रपौत्रा बैसविले
इतिहासाची दूषित पाने
उलटुनी जगण्या शिकवियले . . . ।।५।।

नवीन वास्तु देवो सकला
आनंदाची मधुर फळे
दिन हे केवळ दिसती सकला
माय माऊली तुझ्यामुळे . . . ।।६ ।।डाऊनलोड करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color