गरज पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

(जो मनुष्य तनमन अर्पण करून परमेश्वराला शरण जातो, अगदी मनापासून देवाचे नामस्मरण करतो त्याच्या हृदयातच देवाची वस्ती असते. देवाला शोधण्यासाठी त्याला देवळात, तीर्थक्षेत्रात किंवा अन्यत्र कोठेही जाण्याची गरज पडत नाही. हे पटवून देण्यासाठी दोन दाखले दिले आहेत. सर्व दानात श्रेष्ठ दान म्हणजे कन्यादान होय. तसेच आईवडिलांची सेवा ही सर्व सेवांमध्ये श्रेष्ठ सेवा होय. )

हृदयी वस्ती ज्या रामाची
त्या गरज न अन्या नामाची . . .

मंदिरी कुणी त्या शोधिती तर कुणी
शोधण्या तीर्थासी जाती
परि अंतरी हरी ज्या नित्य वसे त्या
गरज न दूजा जाण्याची
त्या गरज न दूजा जाण्याची . . . १

करिती दाना कुणी सुवर्णा
कर्णापरि कवचा देती
परि कन्यादाना करि जो स्वकरी
गरज न दुजा दानाची
त्या गरज न दूजा दानाची . . . २

गरिबासही ते कुणी सेविती
अपंगसेवा कुणी करती
परि प्रथम सेविता मातपित्या त्या
गरज न दूजा सेवेची
त्या गरज न दूजा सेवेची . . . ३डाऊनलोड करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color