स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow भारतीय भाषांसाठी एक संपर्क लिपी
भारतीय भाषांसाठी एक संपर्क लिपी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 
भारतीय भाषांसाठी एक संपर्क लिपी
प्रा. वा. म. कुलकर्णी

विविध भाषा, पंथ यांनी नटलेला हा आपला भारत देश आंतरिक ऐक्य भावना आरि समान विचारांनी स्वाभाविकपणे प्रभावित आहे. सोईकरिता एक राष्ट्र्भाषा हवीच. त्याहीपेक्षा एक संपर्कलिपीची जास्त आवश्यकता आहे. एक समान लिपीमुळे सर्व भाषिकांमध्ये आता दिसणारा परकेपणा जाणवणार नाही.
हिंदी ही राष्ट्र्भाषा म्हणून गेल्या अर्धशतकात प्रसारित झाली नाही. याला राजकीय पुढार्‍यांचे स्वार्थी संकुचित प्रवृत्तीवर आधारित राजकारण आणि भाषातज्ज्ञ लेखक यांनी दाखवलेली अजागरुकता ही प्रमुख कारणे होय. आज इंग्रजी भाषा समृध्द दिसते पण त्यामागे शेकडो वर्षांत सर्व क्षेत्रांतील पाश्चिमात्य लोकांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा विसरता कामा नये. ती माणसे मधमाशीसारखे ज्ञानाचा शोध घेत आपल्या ज्ञानात भर घालीत. ज्ञान आत्मसात करीत. उदा. जर्मन बिशप रेव्ह. किटेल यांनी आपली प्रकृती ठीक नसताना जवळ जवळ सबंध जीवन कर्नाटकात भटकण्यात घालवून सत्तर हजार शब्दांचा कन्नड - इंग्रजी असा पहिला शब्दकोश बर्लिनमध्ये प्रसिध्द केला. संस्कृत अभ्यासाकरिता विशेषत: जर्मनीत पहिल्या (१९१४) महायुध्दाच्या काळापासून आजतागायत आणि दुसर्‍या महायुध्दातील (१९४६) जर्मनीच्या पाडावानंतर (तेथील शास्त्रज्ञ आणि शास्त्र ग्रंथ स्थलांतरीत झाल्याबरोबर) अमेरिका, रशिया, फ्रान्स व आता सर्व युरोपीय राष्ट्रंमध्ये जोमाने प्रयत्न चालू आहेत. आपली भाषा वृध्दिंगत करण्याकरिता हल्ली इंग्लंडमध्ये शाळेतून संस्कृत शिकवण्यात येते. आपण हल्लीचे भारतीय कसे ? स्वभाषा संपन्न करण्याकरिता काय प्रयत्न करतो ? शेजारील प्रदेशाची भाषा शिकणे दूरची गोष्ट. संस्कृतची कोण अनास्था ! आपण संस्कृतमध्ये तज्ञ नका होऊ पण त्या भाषेतील शब्दांचा उपयोग करण्याची कुशलता (शींूोश्रेसळलरश्र शुशीलळीश) आली तरी आपल्याला योग्य नवनवीन शब्दांचा तुटवडा कधीच भासणार नाही. मूळ संस्कृत शब्दापासून कित्येक विदेशी भाषेतील शब्द तयार झाले आहेत हे सोदाहरण दाखविता येईल.
जागतिक संपर्क भाषा आणि विज्ञान तंत्रज्ञान यांत प्रगती करण्यासाठी इंग्रजी अवश्य शिकावे. पण भारतीय भाषा दुबळी, पांगळी करण्याकरिता इंग्रजीचा वापर नको. राजकारणी लोकांमुळे नका ेती अयोग्य माणसे आधुनिक प्रसार माध्यमामध्ये गुंतलेली आहेत. हे देशाला घातक आहे. हिंदी कार्यक्रमात दूरदर्शनवर `इस ब्रेक के बाद', साक्षरता मिशन इ. शब्द सर्रास कानावर पडतात. ही कसली हिंदी ! सर्व भारतीय भाषा समृध्द आहेत. ऊठ सूट इंग्रजी, विदेशी शब्दांचा उपयोग करण्यामुळे अस्तित्वात असलेले आपले योग्य शब्द नाहीसे होतील या उलट संस्कृत शब्दांवर आधारित योग्य शब्द उपयोगात आणले तर सर्व भारतीय भाषा एकमेकींजवळ येतील. एंटरप्राईझ, अपार्टमेंट इ. नवीन शब्दांना योग्य प्रतिशब्द देण्यात आजची भाषा तज्ञ मंडळी आणि शासकीय माध्यमे इ. जागरुक असणे आवश्यक आहे. लोकमान्य टिळक यांनी सुमारे शंभर वर्षापूर्वी चक्क मराठीत केसरी वृत्तपत्र काढताना दाखवलेली चिकाटी आपण ध्यानात आणावी सर्व भारतीय भाषेतील समान शब्दांचा कोष करण्यात यावा.
तत्पूर्वी डॉ. आंबेडकर, बहुभाषी विनोबा भावे यांनी सुचविल्याप्रमाणे, सर्व भारतात एक संपर्कलिपी म्हणून देवनागरी लिपीचा उपयोग होणे अगत्याचे आहे. दक्षिणी भाषेतील शब्दोच्चारांना सामावून वैकल्पिक लिपी, एक संपर्क लिपी या अर्थाने सर्व भारतीय भाषांकरिता देवनागरीचा स्वीकार व्हावा. इंग्रजीसाठीसुध्दा २६, ए.बी.सी.डी. मोठी आणि तीच ए.बी. सी.डी. लहान अक्षरे निरर्थकपणे वापरण्याऐवजी, वैज्ञानिक दृष्ट्रि ने योग्य क्रमाने मांडलेली आपली ५२ अक्षरे एकदा शिकून उपयोगात आणली की इंग्रजीत स्पेलिंग उच्चारातील घोटाळा कधी होणार नाही. बर्नाड शॉ यांनी आपल्या खरमरीत विनोदी शैलीत इंग्रजीतील २६ अक्षरे शब्दोच्चारांचे ओझे पेलण्यास किती केविलवाणी आणि किती असमर्थ आहेत याबाबत लिहितात-

ङ्गखष ींहश ळपींीेर्वीलींळेप ेष र पशु एपसश्रळीह रश्रहिरलशीं षेी एपसश्रळीह श्ररपर्सीरसश लेीीं र लर्ळींळश्र ुरी..... ख वे पेीं र्सीीवसश ळीं. (ठशष. िशीषरलश ींे थळश्रीेपङ्खी. ढहश ाळीरर्लीर्श्रीी लळीींह ेष र श्ररपर्सीरसश.)ङ्घ

रोमनलिपीचे औचित्य, श्रेष्ठता दाखवण्यात इंग्रजी वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमे यांनी केविलवाणे प्रयत्न करण्याऐवजी देवनागरीचा प्रचार - प्रसार नेटाने करावा - म्हणजे देशभर सर्वत्र सर्वांना नावाच्या व गावांच्या पाट्या तरी वाचता येतील. सारंच खूप सोयीचे होईल एकंदरीत सर्वांना आणि वर उल्लेखिल्याप्रमाणे संस्कृत शब्दांवर आधारित किंवा सर्व भारतीयांना समजण्यासारख्या (लेाोप ुेीवी) शब्दांचा उपयोग केल्यास सर्व भारतीय भाषांमधील जवळीक वाढेल आणि थोड्या अवधीत एक संपर्क भाषा सहजरीत्या रुढ होईल.
जसे इंग्रजी भाषा सोपी करण्याकरिता बेसिक इंग्लिश सारखे प्रयत्न चालले आहेत तसेच हिंदी सुलभ करण्याचे प्रयत्न व्हावेत. काही व्याकरणाचे नियम-विशेषत: शब्दांचा लिंगाबद्दलचे नियम इंग्रजी/दाक्षिणी भाषेतल्यासारखे सुट सुटीत करायला हवेत. उदा. टेबल, ट्न्ेन, पेन, ट्न्क, रॉकेट वगैरे नवीन शब्द वापरताना त्यांच्या लिंग विचाराबद्दल एक वाक्यता हवी. (आवाज मराठीत पुल्लिंग तर हिंदीमध्ये स्त्रीलिंग!) तसेच अंक, संख्या इंग्रजीतल्या मान्य करुनही संख्या मोजताना उदा. सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस, तीस वगैरेच्या ऐवजी लिहिण्याच्या क्रमानेच म्हणजे वीससात, वीसआठ, वीसनऊ, तीस म्हणण्याची पध्दत रुढ करणे योग्य होय.
असे छोटे छोटे बदल करण्याने एक सोपी संपर्क भाषा सहजपणे लोकांच्या प्रत्यक्ष वापरात येऊ शकेल मग असे होण्यास पन्नास वर्षांचा कालावधी लागणार नाही.
एक वैकल्पिक संपर्क लिपी- काही सूचना
भारतीय भाषांमधील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने देवनागरी लिपीवर आधारित एक संपर्क लिपी येथे सुचविली आहे. ही टंकलेखनासही सुकर होईल आणि दक्षिणी भाषेतील बहतेक शब्दोच्चारांना सामावून घेईल. तज्ञ मंडळींनी यातील योग्य तेवढा विचार ग्राह्य व्हावा.
१) `रव' हे अक्षर `र' आणि `व' जोडून लिहिण्यासारखे त्या ऐवजी `ख' असे लिहिण्याच्या प्रघात योग्य होय.
२) दीर्घ स्वरांकरिता `९' किंवा `%' चिन्हे वापरावीत. उदा. `अे' ला ऱ्हस्व ए मानून दीर्घ ए करिता अे९ किंवा अे% लिहिता येेईल. यामुळे अे, अे% आणि अै च्या क्रमात क् या व्यंजनाचे के, के% आणि कै होतील इंग्रजीतील शिप याला पेन असे लिहू आणि रिळप, ींीरळप इ. पे%न,ट्रे%न वगैरे लिहू.
तसेच ओ ला ऱ्हस्व ओ मानून, दीर्घ प्रकार `ओ%' असे लिहू म्हणजे ओ, ओ% आणि औ च्या क्रमाने ग् व्यंजनाचे गो, गो% आणि गौ असतील.
३) इ, ई, उ, ऊ च्या ठिकाणी आि,आी, अु, अू यांच्यापेक्षा ई, ई%, र्उी, र्उी% वाचनगती वाढवणेच्या दृष्टीने योग्य आहेत. उदा. वीमल, कीरण, वी%र (विमल, किरण, वीर ऐवजी) आणि (`उ' कार चिन्ह लावताना व्यंजनाखाली जागा द्यावी लागत नाही.) उदा. र्की, र्की, कुरु, गुरु ऐवजी र्की र्री , र्गी र्री .
४) कृष्ण, क्रांति या मधील र कारात बहुतेकांना फरक जाणवत नाही म्हणून ऋ, लृ वगैरे संस्कृतकरिता मर्यादित ठेवावेत. (हल्ली, जुन्या कन्नड मधील दोन तऱ्हेचे `र' आणि दोन तऱ्हेचे `ळ' राहिले नाहीत.)
वरील सर्व सूचना मान्य होतील असे नव्हे. तज्ञांच्या मते देवनागरी लिपी कमीत कमी बदल करुन सर्वानुमते प्रमाणित करणेच योग्य ठरेल.
सूचित वर्णातील स्वर: अ, आ, ई, इ%, र्उी, र्उी%, अे, अे%, अै, ओ, औ%, औ, अं. अ: (१४)
व्यंजन (वर्गीय) क, ख, ग, घ, ङ ..... पर्फेंभम (२५)
व्यंजन(अवर्गीय) य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ (९)

स्वरासह उदा. क,का, र्क, र्क%, र्की, र्की%, के, कै, कौ, कौ%, कौ, कं, क:
भारतात ८४५ बोली भाषा आहेत. अक्षरांचे / शब्दांचे उच्चार एक सारखे होत नाहीत. ऊळरश्रशलींळल वळषषशीशपलश फरक राहतोच. उदा. 'अ` चा उच्चार काश्मिरी, बंगाली, दक्षिणी भाषेमध्ये एक सारखे होत नाहीत. मराठीतच 'च` चा उच्चार दोन प्रकारे चहा व चमचा प्रमाणे होतो. पण म्हणून काही वेगवेगळया उच्चार छटांना अनुसरून नवीन नवीन अक्षर चिन्हे वापरणे चुकीचे होईल. कारण सर्व आवाजांप्रमाणे अक्षर योजना केली तर असंख्य अक्षरे बनतील. म्हणून अक्षरांचे / शब्दांचे योग्य उच्चार करणे योग्य होईल. या बाबतीत प्रचार माध्यमांचा योग्यप्रकारेे उपयोग करावयास हवा.

प्रा. वा. म. कुलकर्णी ,श्रीवासुदेव चिंतन, विश्रामबाग, सांगली.

 

 

 

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color