काजूची बर्फी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
साहित्य :-
दोन वाट्या काजू, दीड वाटी साखर, अर्धी वाटी खवा, पाव जायफळ
कृती :
काजूची यंत्राने पूड करून घ्यावी. खवा थोडा भाजून घ्यावा. एका पातेल्यात साखर घालून साखरेचा एक-तारी पाक करून घ्यावा व त्यात काजूची पूड घालून थोडे शिजवावे. साधारण घट्ट गोळा झाला की खाली उतरवून त्यात भाजलेला खवा घालावा व चांगले घोयावे व जायफळाची पूड घालावी. नंतर पोळपाटाला तुपाचा हात लावून त्यावर तो गोळा पातळ लाटून वड्या कापाव्यात. त्या वड्यांवर चांदीची वर्खही घालतात.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color