दत्तगुरुभेट पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   

जाऊ चला वाडीला जाऊ औदुंबराला
भेटाया जाऊ चला गुरुदत्ताला ऽ ऽ ऽ . . . १

नदीकाठ मंदिरी समाधान अंतरी
भेटतसे तिथे हरी सद्‌भक्ताला ऽ ऽ ऽ . . . २

मूर्ती गोजिरी अहा किती साजिरी पहा
लाभ सुखशांतीमहा नयनाला ऽ ऽ ऽ . . . ३

नयनांच्या निरांजनी धूपदीपचंदनी
स्वर्गसुखदालनी गुरु गवसला ऽ ऽ ऽ . . . ४

जाऊ नका तुम्ही कुठे गुरु आहे खरा इथे
ब्रह्माविष्णुमहेश दिसे एका जागेला ऽ ऽ ऽ . . . ५डाऊनलोड करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color