स्वागतकक्ष arrow माहिती तंत्रज्ञान arrow वेब डिझाइन arrow मराठी भाषेत संकेतस्थळाचा पत्ता
मराठी भाषेत संकेतस्थळाचा पत्ता पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

संदर्भ - सकाळ वृत्तसेवा १८-१-२०१२
पुणे - एखाद्या संकेतस्थळाचा पत्ता इंग्लिशऐवजी मराठी भाषेतही टाइप करणे आता शक्‍य झाले आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने "सी-डॅक'ने ही किमया साध्य केली असून, पहिल्या टप्प्यात हिंदी, मराठी, कोकणी, नेपाळी, डोंगरी, बोडो, मैथिली व सिंधी या भाषांमध्ये याचा प्रत्यय येणार आहे.

उदाहरणार्थ ः संकेतस्थळावर "सकाळ' वृत्तपत्रासाठी इंटरनेटवर www.esakal.com असे इंग्रजी भाषेत टाइप करावे लागते. संकेतस्थळ मराठी भाषेत उपलब्ध असले तरी त्याचा पत्ता (युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर- यूआरएल) इंग्रजीत असतो.

'सी-डॅक'मध्ये झालेल्या संशोधनामुळे आता www.ईसकाळ.भारत असा "यूआरएल' टाइप करणे शक्‍य होणार आहे. केवळ मराठी भाषेतच नव्हे तर आठ प्रादेशिक भाषांत ही सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती "सी-डॅक'च्या "जिस्ट' तंत्रज्ञानाचे सहायक संचालक महेश कुलकर्णी यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचा हा प्रकल्प सी-डॅकतर्फे राबविला जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

एखादे संकेतस्थळ कोणत्या देशातील अथवा कोठे संलग्न आहे, याची माहिती मिळावी म्हणून "कंट्री कोड टॉप लेव्हल डोमेन' (सीसीटीएलडी) ही संकल्पना जगात मान्य झाली आहे. त्यानुसार संकेतस्थळाच्या नावापुढे देशाचे आद्याक्षर लावण्याची सुरवात झाली आहे. उदा. ग्रेट ब्रिटन "यूके', पाकिस्तान "पीके', थायलंड "टीएच', भारत "आयएन'. जानेवारी 2005 पासून "डॉट आयएन' सीसीटीएलडी डोमेनअंतर्गत सध्या दहा लाख संकेतस्थळे निर्माण झाली आहेत. आता या पुढील टप्प्यात देवनागरी भाषेतच संकेतस्थळाच्या नावाची नोंदणी करून त्याची अंमलबजावणी शक्‍य होणार आहे. त्यासाठी आठ प्रादेशिक भाषांत तयार झालेल्या संकेतस्थळाच्या नावाच्या पुढे "डॉट भारत' असे नामकरण शक्‍य होईल. संकेतस्थळाच्या नावापुढे काही जणांना "डॉट कॉम' हवे असल्यास नोंदणी करताना संबंधित पर्यायाची निवड केल्यास तेही शक्‍य आहे.

'देवनागरी लेखनपद्धत वापरून आठ प्रादेशिक भाषांत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी "सी-डॅक'ने संबंधित भाषांमधील नियमांच्या आधारे एक विशिष्ट भाषा विकसित केली आहे. संकेतस्थळाचे नाव तयार करताना त्या भाषेत ते नाव अगोदर आले आहे का, याचाही आढावा घेणे शक्‍य होणार आहे. एकसारखा शब्द असेल तर त्याची पुनरुक्ती होऊ नये किंवा त्यासारखा दिसणारा दुसरा शब्द तयार होऊ नये, झाल्यास तो स्वीकारला जाणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे,'' असे कुलकर्णी यांनी नमूद केले.

कुलकर्णी म्हणाले, 'डॉट आयएन' "सीसीटीएलडी'अंतर्गत संकेतस्थळाचे नाव तयार करण्यासाठी निक्‍सीचे (नॅशनल इंटरनेट एक्‍स्चेंज ऑफ इंडिया) जगभरात 92 रजिस्ट्रार असून त्यातील 40 भारतात आहेत. संबंधित संकेतस्थळावर फिशिंग हल्ला होऊ नये, यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रादेशिक भाषेत नावासह संकेतस्थळ निर्माण करताना विशिष्ट पद्धतीचा अवलंब केला तर इंग्रजी भाषेत तेच नाव टाइप केल्यावर प्रादेशिक संकेतस्थळापर्यंतही संबंधितांना पोचता येईल. यासाठी "सी-डॅक'तर्फे सर्च इंजिन प्लग इन तयार करण्यात येणार आहे.''

स्वतःच निवडा वेबसाइटचे नाव
आठ प्रादेशिक भाषांमधील संकेतस्थळ नावासह कसे निवडायचे, याचे प्रात्यक्षिक "सी-डॅक'च्या (http://idn.cdac.in) या संकेतस्थळावर येत्या दोन दिवसांत उपलब्ध होणार आहे. त्यात एखाद्या व्यक्तीला प्रादेशिक भाषेतील नाव निवडून संकेतस्थळाचे नाव कसे निश्‍चित करता येईल, याचे प्रात्यक्षिक स्वतःला करता येणार आहे.

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color