भूपाळी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   

उठि उठि रे नंदकिशोऽऽरा
विनवू किती तुज मी मनमोरा
रजनी जाई लयाऽऽऽला . . . ॥ ध्रु. ॥

आकाशीच्या भव्य महाली
रविराजाची येता स्वारी
गाली उषेच्या आली लाली
दिनमणि ये उदयाऽऽऽला . . . १
उठि उठि रे नंदकिशोऽऽरा
विनवू किती तुज मी मनमोरा
रजनी जाई लयाऽऽऽला

कुक्कुट कोकिल दे ललकारी
केकावली करी मयूर न्यारी
गगनी घेती पक्षी भरारी
झाली स्वागतवेऽऽऽला . . . २
उठि उठि रे नंदकिशोऽऽरा
विनवू किती तुज मी मनमोरा
रजनी जाई लयाऽऽऽला

पुष्पगुच्छ शिरी धरिती वेली
मंदशीत त्या वायूलहरी
सुमनांची बरसात भूवरी
देई सुख नयनाऽऽऽला . . . ३
उठि उठि रे नंदकिशोऽऽरा
विनवू किती तुज मी मनमोरा
रजनी जाई लयाऽऽऽला

गाई नेण्या यमुनातीरी
सखेसोबती येती दारी
दहीभाताची घेई शिदोरी
जोडी करकमलाऽऽऽला . . . ४
उठि उठि रे नंदकिशोऽऽरा
विनवू किती तुज मी मनमोरा
रजनी जाई लयाऽऽऽलाडाऊनलोड करा.
 
< मागील

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color