रणजित देसाई पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

रणजित देसाई (१९२८-१९९२)

रणजित देसाई हे मराठीतील एक यशस्वी कांदबरीकार व कथालेखक म्हणून ओळखले जातात. त्यांचे संपूर्ण नाव रणजित रामचंद्र देसाई असे होते. त्यांचा जन्म इ.स.१९२८ मध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेली ‘श्रीमान योगी’आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर लिहिलेली ‘स्वामी’या दोन कांदबर्‍या अतिशय लोकप्रिय ठरल्या.

एक कथालेखक व नाटककार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांच्या ‘स्वामी’ या कांदबरीला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले होते. भारत सरकारने इ.स. १९७३ मध्ये त्यांना ‘पदमश्री’ हा किताब देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा उचित गौरव केला होता.

ग्रंथसंपदा : स्वामी ,श्रीमान योगी, माझा गाव इत्यादी कांदबर्‍या .रुपमहाल, कणव, मोरपंखी सावल्या इत्यादी कथासंग्रह. गरुडझेप, हे बंध रेशमाचे, रामशास्त्री इत्यादी नाटके.

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color