न.चिं.केळकर पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

न.चिं. केळकर हे ’साहित्यसम्राट’ म्हणून ओळखले जातात. त्यांचे संपूर्ण नाव नरसिंह चिंतामण केळकर असे होते.त्यांचा जन्म सोलापूर जिल्यातील मोडनिंब या गावी इ.स.१८७२ मध्ये झाला. केळकरांचे शिक्षण मिरज, कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा निरनिराळया गावी झाले.

केळकरांच्या सार्वजनिक कार्याची सुरवात लोकमान्य टिळक यांच्या हाताखाली व मार्गदर्शनाखाली झाली. इ.स.१८९७ मध्ये टिळक तुरुंगात गेल्यावर ‘केसरी’च्या संपादकाची जबाबदारी त्यांनी काही काळ सांभाळली. लोकमान्यांच्या मृत्यू नंतर ‘केसरी’ची सर्व सूत्रे केळकरांच्या हाती आली. नाटक, निंबध, टीका, चरित्रलेखन, इत्यादी वाड्‌मयप्रकारात त्यांनी मोठेच यश मिळवले होते. त्यांचे ‘तोतयाचे बंड’ हे नाटक मराठी रंगभूमीवर खूपच यशस्वी झाले होते. १९२१ मध्ये बडोदे येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.

ग्रंथसंपदा : तोतयाचे बंड, अमात्य-माधव, कृष्णार्जुन युद्ध ही नाटके; याशिवाय लोकमान्य टिळ्क यांचे चरित्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान, इंग्रज व मराठे, सुभाषित आणि विनोद, हास्यविनोदमीमांसा हे ग्रंथ इत्यादी.

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color