चिं.वि.जोशी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

चिं.वि.जोशी हे मराठीतील एक महत्वाचे विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे संपूर्ण नाव चिंतामण विनायक जोशी असे होते. त्यांचा जन्म १८९२ मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालय व फ़र्गसन कॉलेजमध्ये झाले. त्यांचा पाली भाषेचा विशेष व्यांसग होता. बौध्द धर्मासंबधी त्यांनी काही लेख्नन केले आहे.

चिं.वि.जोशी विनोदी लेखनाबद्दलच विशेष प्रसिद्ध आहेत.त्यांच्या विनोदातून मानवी जीवनातील व स्वभावातील विसंगतीचे दर्शन होते. चिमणभाऊ व गुंडयाभाऊ ही त्यांची मानसपुत्रांची जोडजोळी मराठी साहित्यात कायमचे स्थान मिळवून बसली आहे. विशुद्ध किंवा निर्मळ विनोद हे चिं.वि.जोशींच्या विनोदाचे एक प्रमुख वैशिष्ट मानले जाते.

ग्रंथसंपदा : एरंडाचे गुर्‍हाळ, चिमणरावाचे चर्‍हाट, वायफ़ळाचा मळा, ओसाडवाडीचे देव, गुंडयाभाऊ, रहाटगाडगे, लंकावैभव, हास्यचिंतामणी, बोरीबाभळी, इत्यादी.

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color