बा.सी.मर्ढेकर पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

बा.सी.मर्ढेकर हे मराठीतील नवकवितेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळ्खले जातात. केशवसुतांनंतरचे मराठीतील एक युगप्रवर्तक कवी म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचे संपूर्ण नाव बाळ सीताराम मर्ढेकर असे होते. त्यांचा जन्म सातारा जिल्यातील मर्ढे या गावी इ.स.१९०९ मध्ये झाला. मर्ढेकरांनी काही काळ ‘टाइम्स ऑफ़ इंडिया ’ या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले होते .इ.स. १९३८ मध्ये आकाशवाणी केंद्राचे आधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

मर्ढेकरांनी मराठी कवितेत आशय व अभिव्यक्ती या दोन्ही अंगानी क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले. यंत्रयुगातील गतिमानतेत माणुसकी हरपत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. समीक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मराठीत नवटीकेचा प्रांरभ त्यांनीच केला. त्यांचे समीक्षा ग्रंथ अतिशय महत्वाचे समजले जातात.

ग्रंथसंपदा : रात्रीचा दिवस, पाणी, तांबडी माती या कादंबर्‍या आणि ‘सौंदर्य आणि साहित्य ’ ‘वाड्‍मयीन महात्मता ’हे समीक्षा ग्रंथ, तसेच काही संगीतिका त्यांनी लिहिल्या आहेत.

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color