स्वागतकक्ष arrow माहिती तंत्रज्ञान arrow वेब डिझाइन arrow साध्या वेबसाईटचे डिझाईन भाग - २
साध्या वेबसाईटचे डिझाईन भाग - २ पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क डॉ. सु. वि. रानडे   
पहिला धडा तुम्ही प्रत्यक्ष करून पाहिला असेल तर तुम्ही टाईप केल्याप्रमाणे वेबपेज वर का दिसत नाही असा प्रश्न पडला असेल.
येथे सर्व शब्द एकाच ओळीत आलेले दिसतात. याचे कारण की ओळ बदलण्यासाठी लागणारा BR टॅग आपण दिला नव्हता.

secondpage.htm
आता नोटपॅडमध्ये खाली दाखविल्याप्रमाणे टाईप करा. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की दुसर्‍या प्रोग्रॅममध्ये दुसर्‍या लिपीत सर्व टॅग लिहिले आहेत. याचा अर्थ असा की कॅपिटल वा स्मॉल अशा दोन्ही प्रकारच्या अक्षरांचा प्रोग्रॅममध्ये वापर केला तरी चालतो.

दुसरे पान secondpage.htm या नावाने सेव्ह करा. ब्राउजरमध्ये दुसरे पान कसे दिसेल हे खाली दाखविले आहे.
या वेबपेजमध्ये h1 ते h6 म्हणजे (h1,h2,h3,h4,h5,h6) या हेडींग (शीर्षक)टॅग चे उदाहरण दाखविले आहे. जरी h1 व h6 हे दोनच टॅग प्रत्यक्ष दाखविले असले तरी इतर टॅग वापरुन काय बदल होतो ते पहा. तसेच ठळक (b), तिरके (i) व अधोरेखित (u) शब्द कसे लिहायचे ते दाखविले आहे. येथेही br टॅग वापरला व न वापरला तर काय होते ते दाखविले आहे. b, i, u हे टॅग एकानंतर एक असे लिहिले तर ठळक तिरके, ठळक अधोरेखित वा ठळक तिरके अधोरेखित असे शब्द लिहिता येतात. प्रोग्रॅम मध्ये वरिलप्रमाणे निरनिराले बदल करून पहा.
आता तुम्हाला कोणताही मजकूर वा पत्र हव्या त्या प्रकारे वेबपेजमध्ये दाखविता येईल.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color