स्वागतकक्ष arrow सय arrow पाश्चात्यांचे अनुकरण
पाश्चात्यांचे अनुकरण पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

पाश्चात्यांच्या अनुकरणाचा वारू वेगाने का दौडतोय?

माझ्या घराजवळ रहणार्‍या पाच वर्षाच्या ‘शलाका’चा वाढदिवस नुकताच थाटात पार पडला. तिला शुभेच्छा व खाऊ देऊन परत येताना माझ्या मनात आले, ‘शलाका’चे घर शंभर टक्के महाराष्ट्रीय. वडील मरठीचे नामवंत प्राध्यापक. आजोबा संस्कृतचे पंडित. अशा घरात मेणबत्त्या विझवून, केक कापून, ‘हॅपी बर्थ डे टू यू’ असे चालीवर म्हणून तो साजरा करावा, असे त्यांना का वाटले असावे? भारतीय पद्धतीने तिला हळद-कुंकू लावून निरांजनांनी ओवाळून तिला औक्षण करावे. तिच्या आवडते पक्वान्न तिच्या मुखात घालावे, या पद्धतीपेक्षा साहेबांची पद्धत त्यांनी कशासाठी अवलंबली? ती केवळ नाविन्याची हौस म्हणावी, की पाश्चात्यांच्या अनुकरणातच त्यांना वाटणारा अभिमान म्हणावा? गेली दहा वर्षे अनेक ठिकाणी मला हेच चित्र पाहायला मिळाले.

वाढदिवसाच्या निमित्ताने त्या व्यक्तीच्या जीवनप्रवासाचे एक पाऊल पुढे पडत असते. अशा वेळी कोणत्याही कारणांनी विझवलेल्या मेणबत्त्यांपेक्षा ‘तमसो मा ज्योतिर्गमय’, ‘अंधारातून मला प्रकाशाकडे ने’ अशी भावना त्या व्यक्तीच्या मनात असणे अधिक स्वाभविक श्रेयस्कर नाही काय? पाश्चात्त्यांनी वाढदिवस कसा साजरा करावा, हा त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येक देशाचे संस्कार त्यांच्या देशाच्या हवामानाशी, इतिहासाशी, परंपरेशी, भूगोलाशी संबंधित असतात, हे विसरून कसे चालेल? आजकाल वेशभूषेपासून केशभूषेपर्यंत आणि खाद्यपदार्थांच्यापासून त्यांच्या चालीरीतीपर्यंत आम्हा असंख्य भारतीय माणसांच्या मनावर पाश्चात्यांच्या अनुकरणाच्या मोहाचा वारू जो स्वार झाला आहे, त्याचे प्रयोजन काय? दोन इंग्रजी यत्ता शिकलेल्या शाळकरी पोरापासून ते उच्चपदावरील मराठी अधिकार्‍यापर्यंत बहुतेकजण तशी काहीच गरज नसताना स्वतःची सहीदेखील इंग्रजीत करतात. त्यात त्यांना एक आगळाच मोठेपणा वाटतो. अलीकडे विवाह वा अन्य मंगलकार्याच्या आमंत्रणपत्रिकाही बर्‍याचवेळा इंग्रजीतच छापलेल्या असतात. त्या अ-मरठी माणसांना उपयुक्त ठरतील, इतरांना त्याचे काय हो? त्या पत्रिकात स्त्रियांचे नाव हल्ली पतीच्या नावापूर्वी छपलेले आढळते. हीही साहेबांचीच नक्कल. त्यातील किती स्त्रियांना असे मानाचे स्थान मिळत असेल हे त्यांचे त्यांनाच ठाऊक?

‘मदर्स डे’, ‘व्हॅलेंटाईन डे’ हे किती प्रचंड जल्लोषात साजरे होतात, हे तर आपण पाहतो आहेच. त्यातून प्रकट होणारी मातृभक्ती किंवा प्रेमभवनेची थोरवी व उत्कटता याही गोष्टी भारतीय मनाला आज हजारो वर्षे सुपरिचित आहेत. ‘मातृदेवोभव’ किंवा प्रेम लाभो प्रेमळाला। त्याग त्याची ही कसोटी’ ही शब्दरत्ने बहुमोल नाहीत कय? असे असताना पाश्चात्यांच्या कल्पना घेऊन जगण्या-वागण्यात कसला आलाय मोठेपणा? त्यांच्या अनुकरणाच्या हव्यासापायीच सुंदर व समर्थ मराठी भाषेचे जे भेसळ झालेले स्वरूप वाचनात, ऎकण्यात येते, त्याने मन व्यथित होते. जगातल्या इतर कोणत्याही देशात मातृभाषेला नगण्य लेखून इतर भाषांचा उदो उदो झालेला दिसत नाही. कारण स्वभाषेची अस्मिता ते प्राणपणाने जपतात. आवश्यक असेल तेथे इंग्रजीचा वापर जरूर करायलाच हवा.ती एक सुंदर भाषा आहे, यातही वाद नाही. पण, ‘भाषा मरता, देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे’ म्हणून ‘परकीचे पद चेपू नका’ हा संदेश कवि कुसुमग्रजांना द्यावासा वाटला ना? मरठीत बोलणे, लिहिणे, व्यवहार करणे यात बर्‍याच लोकांना कमीपणा वाटतो. मागासलेपणाचे, अप्रतिष्टितपणाचे वाटते. साहेब जे जे व जसे करतो, तेच दर्जेदार असे त्यांना वाटते. त्यांनी दोनच प्रश्न स्वतःला विचारावेत, एक पाश्चात्य लोक आमचे किती अनुकरण करतात, आणि त्यांची सर्वत्र आढळणारी स्वच्छता, वेळ पाळण्याची दक्षता, कामातली शिस्त अशा चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्यात आम्ही इतके मागे का? याचे उत्तर एक आहे की, इंग्रजसाहेब शरीराने येथून निघून गेला असला तरी आमचे मन अजून त्यांच्या दास्यातच खूप अडकलेले आहे. त्याचे रक्षण देव तरी कसे करणर?         

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color