स्वागतकक्ष arrow इ-प्रकाशन arrow स्त्री जीवनाची ही कहाणी
स्त्री जीवनाची ही कहाणी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

स्त्री जीवनाची ही कहाणी

‘कुसुमबाई मोतीचंद महिला सेवाग्राम’ ही पुण्यातील एक नामवंत संस्था! नाना प्रकारच्या दुःखांनी गांजलेल्या, परिस्थितीने होरपळलेल्या, जीवनाचा मार्ग चुकलेल्या, परित्यक्ता अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांना धीर, आधार देणरी ही संस्था पाहण्याचा योग एका व्याख्यानाच्या निमित्ताने मला आला.

सुमती संत ही माझी बलपणापासूनची मैत्रीण त्या संस्थेची कार्यवाह होती. तिने संस्थेचे सर्व आवार मला हिंडून दाखविले. त्यातल्या दोन दालनातून जाताना मी दरवाजातच थबकले. एका दालनात पाच सहा वर्षाच्या आतली मुले डोळे मिटून, हात जोडून प्रार्थना म्हणत होती. पण त्यांच्या चेहर्‍यावरचे कारुण्य, अनाथपण जिव्हारी लागावे असेच होते. ज्यांच्या आयांनी त्यांना उकिरड्यावर, स्टेशनवर, बसथांब्यावर किंवा असेच कुठेतरी ‘टाकून’ दिलेले होते ते जाणून मन गलबलून गेले. मुलांच्या दालनातून थोडे चालून गेल्यावर एक दालनात काही मुली पाळणे हलवीत होत्या. त्यांचे वय असेल पंधरा सोळा इतकेच. त्या पांढरी पातळे नेसल्या होत्या. नि डोक्यावरून पदत घेऊन किंचित खाली मान घालून पाळण्याची दोरी ओढत होत्या. ते पहिल्यावर मी सुमतीला म्हटले, "अगं, यांना शाळेत पाठवायचे सोडून हे काय काम लावले आहेस तू यांच्या मागे?" तेव्हा ती म्हणाली, "मालती, ही यांचीच मुले आहेत. या मुलींना फसविणारे, तोंडघाशी पडणारे पुरुष बहुतांशी त्यांच्या कुटुंबातले, जवळचे, दूरचे आप्त, शेजारी, एखादा सुपरिचित गाववाला अशांपैकीच आहेत. अशी फसवणूक होऊनही ‘जग काय म्हणेल?’ या भीतीने "बाई, आता त्या माणसाशीच माझे लग्न लावून द्या" असे काहीजणी म्हणतात. पण ते अनेक कारणांनी शक्य नसते. यांची मुले थोडी समजत्या वयाची होईतो आम्ही यांना इथे ठेवून घेतो, त्यानंतर त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करतो.’ सुमतीचे बोलणे ऎकताना स्त्री तिच्यावर लादल्या गेलेल्या परिस्थितीने किती अगतिक होते, किती अनाथ, एकाकी, पोरकी आणि बहिष्कृतही होते, हा विचार मला अतिशय अस्वस्थ करीत होता. ती संस्था पाहिल्याला बराच काळ लोटून गेला.

गेल्या पाच पन्नास वर्षात स्त्रियांना शिक्षण मिळून आर्थिक दृष्ट्या त्या स्वावलंबी झालेल्या दिसतात. समाजाच्या विविध क्षेत्रात नेतृत्व करण्याइतक्या त्या समर्थ झालेल्या आढळतात. तरी आजही स्त्रीचे जीवन अधिक सुरक्षित झाले आहे असे वाटत नाही. एखादी काडेपेटी वापरून झाल्यावर टाकून द्यावी, तशीच स्थिती शहरात काय किंवा खेड्यात काय, अनेक स्त्रियांच्या नशिबी येते. याला काय म्हणावे? वृत्तपत्र उघडावे, तर ‘हुंड्यासाठी पत्नीला जाळले’, ‘बालिकेवर वृद्धाने बलात्कार केला’, अशा बातम्या पहिल्या पानावर छापलेल्या असतात. बलात्कारित, अपहृत, मुद्दाम वाममर्गाला लावलेल्या मुलींच्या कहाण्या वाचताना मन क्षुब्ध, प्रक्षुब्ध होते. मनात येते, समाजातली ही वासनांधतेची कीड कध दूर होईल? स्त्रिया स्वरक्षणसमर्थ झाल्यावर? कठोर कायदे करून अशा नराधमांना कठोर शिक्षा दिल्यावर? तरूण मुलामुलींना लैंगिक शिक्षण सक्तीचे केल्यावर? की स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे, ही पुरुषांची अतिशय विकृत, समाज नासवणरी ओंगळ दृष्टी बदलल्यावर? समाजजीवन निरामय व्हावे म्हणून कार्य करणार्‍या समाजसेवक-सेविकांची संख्या वाढायला हवी. स्त्रीला उपेक्षिततेची वागणूक देऊन मूळ प्रश्न सुटणार कसा? त्यासाठी ‘पुरुषप्रधान’ समाजव्यवस्थेतच अमूलाग्र बदल व्हायला नको का?     

 

 

 

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color