स्वागतकक्ष arrow मराठी भाषा arrow ‘मराठी शब्द’ संकेतस्थळ
‘मराठी शब्द’ संकेतस्थळ पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

मराठी शब्द ची उद्दिष्ट्ये:

 • मराठी भाषेत नवीन शब्द निर्मीतीच्या "नवीन" विचारांना चालना देणे
 • मराठी भाषा अभ्यासकांना एक संदर्भ म्हणून ह्या माहितीकडे बघता यावे असे तंत्रशुध्द विचार मांडणे
 • लहान मुला-मुलींमधे मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, ती त्यांना तंत्रशुद्धतेने लिहीता, बोलता, वाचता यावी ह्यासाठी प्रयत्न करणे

ह्या उपक्रमामुळे अनेक व्यक्तिशी नवा संपर्क आला व त्यांनी ज्या सुचना दिल्या त्यातील एक होती - मराठी शिक्षणासंबंधी व एकंदरीतच शिक्षणासंबंधी ज्या व्यक्ति मनापासून काही मुलभूत प्रयोग करत आहेत, त्यांनी एखाद्या माध्यमातून एकत्र यावे, व त्यांच्या कार्याविषयक विचारांची देवाणघेवाण करावी. त्यासुचनेनुसार मराठीशब्दच्या उद्दीष्टांमधे खालील उद्दीष्ट्य अंतर्भूत करण्यात आले आहे.

 • मराठी शिक्षणासंबंधी व एकंदरीतच शिक्षणासंबंधी ज्या व्यक्ति मनापासून काही मुलभूत प्रयोग करत आहेत, त्यांनी मराठीशब्द.कॉम ह्या माध्यमातून एकत्र यावे, व त्यांच्या कार्याविषयक विचारांची देवाणघेवाण येथे करावी.

ही उद्दीष्ट्ये नाहीत:

 • शुद्धलेखन आणि शब्द ह्यांचा एकमेकांशी संबंध असला तरीही, हे कोषाम्यक शुद्धलेखन ह्या विषयाशी संलग्न नाही. शुद्धलेखनाविषयीचे लिखाणधागे नम्रपणे काढले जातील.

आवाहन:

 • हे कोषाम्यक (वेबसाईट) ज्यांना नवीन मराठी शब्द तयार करायला आवडतात त्यांच्या साठी आहे.
 • नवीन मराठी शब्द निर्मीती हा एक नुसताच छंद नसुन भाषेचा एक गंभीर अभ्यास व अवघड कला आहे. त्यात भाषेच्या विविध घडणींचा, व्याकरणाचा, सामाजिक जाणीवेचा, लोकांच्या स्पंदनांचा, आधुनिकतेचा, सर्वसमावेशक विचार करणे गरजेचे बनते. त्यामुळे कुठलाही व्यावसायीक हेतु न ठेऊन, हे कोजळ अशा भाषाप्रेमींसाठी निर्मिले आहे की, ज्यांना हे असे करावेसे खुप दिवसांपासुन मनात होते; ज्यांना चुकीचे, उगीचच अवघड असलेले, शब्द वापरतांना खूप यातना होतात अशांसाठी आहे.
 • फक्त एक भाषाप्रेमी ह्या नात्याने "एकत्र" येणाय़्रांसाठी आहे.
 • मराठीचे अभ्यासक, शिक्षक, प्राध्यापक, साहित्यीक, विद्यार्थी, संस्था, प्रकाशक, भाषाप्रेमी, सर्व प्रकारांची मराठी बोलणारे, कलाकार, सर्वांसाठी आहे.
 • अर्थातच, हे कोजळ् वरील उद्दीष्टांना वाहिलेले असल्यामुळे, फक्त त्याच उद्दीष्टांशी संबधीत विषयांवर चर्चा येथे होईल.
 
< मागील   पुढील >

 • Narrow screen resolution
 • Wide screen resolution
 • Auto width resolution
 • Increase font size
 • Decrease font size
 • Default font size
 • default color
 • blue color
 • green color